Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : अतिवृष्टीमुळे ८४ हेक्टरवर पिकांचे नुकसान

Heavy Rain Crop Loss : कृषी विभागाच्या अहवालानुसार नुकसान झालेल्या नांदगाव तालुक्यामध्ये ८ गावांत १८२ तर इगतपुरी तालुक्यातील एका गावात १२४ शेतकरी अशा ९ गावांमध्ये हे नुकसान असून ३०६ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्याच्या विविध भागांत खरिपातील कापणीस आलेल्या पिकांची दाणादाण उडाली आहे. त्यामध्ये नांदगाव व इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान ८४ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे.

जिल्ह्यात आणि खरीप पिकांची कापणी सुरू असताना पावसाने हजेरी लावल्याने मका, सोयाबीन, बाजरी या पिकांचे प्रमुख नुकसान आहे. याशिवाय अनेक भागात कांदा लागवडी पाण्याखाली गेल्याने त्या खराब झाल्या आहेत. तर अनेक ठिकाणी रब्बी कांदा रोपवाटिका तयार झाल्या असताना पाण्याच्या प्रवाहामुळे रोप व बियाणे वाहून गेल्याने नुकसान वाढलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका आहे.

कृषी विभागाच्या अहवालानुसार नुकसान झालेल्या नांदगाव तालुक्यामध्ये ८ गावांत १८२ तर इगतपुरी तालुक्यातील एका गावात १२४ शेतकरी अशा ९ गावांमध्ये हे नुकसान असून ३०६ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.

नांदगाव तालुक्यातील पूर्व भागातील न्यायडोंगरी महसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या परिसरात काही शेतकऱ्यांच्या कांदा रोपवाटिका वाहून गेल्याने त्यांना प्रस्तावित लागवडी करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे दुबार रोपवाटिका निर्मितीची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहेत.

अनेक महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली नाही. मात्र पावसामुळे नुकसान आहे; मात्र तेथेही पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. येवला तालुक्यातील पाटोदा मंडलात अनेक ठिकाणी मका भुईसपाट झाला. मालेगावात खरिपातील बाजरी, मका व हिरवा चारा वादळी-वाऱ्यामुळे भुईसपाट झाले. माळमाथ्यासह सर्वच भागांत कपाशी व मका पिकांचे नुकसान झाले आहे.

नांदगावात पंचनामे सुरू

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पंचनामे सुरू झाल्याचे कृषी विभागाच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले.

कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार झालेले नुकसान

पीक नुकसान (हेक्टर)

मका ४०

भात २५

कांदा १५

कांदा रोपवाटिका ४

एकूण ८४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT