Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : खानदेशात पावसाने पीकहानी सुरूच

Heavy Rain Crop Loss : खानदेशात गेल्या आठवडाभरापासून ढगाळ, पावसाळी वातावरण होते. परंतु बुधवारी (ता.१८) अनेक भागांत जोरदार ते मध्यम पाऊस आला.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात गेल्या आठवडाभरापासून ढगाळ, पावसाळी वातावरण होते. परंतु बुधवारी (ता.१८) अनेक भागांत जोरदार ते मध्यम पाऊस आला. यामुळे उडीद, मूग, कापूस पिकाची हानी वाढली आहे.

गेले पाच ते सात दिवस अंशतः ढगाळ वातावरण, वेगवान वारे, अशी स्थिती होती. तापमानही ३४ ते ३८ २ अंश सेल्सिअसपर्यंत होते. शेतीकामांची लगबग सुरू होती. परंतु अशातच पाऊस आला. यामुळे पीकहानी वाढली आहे. मध्यंतरी अनेक दिवस पाऊस होता.

मागील दोन - तीन दिवस सकाळी हलके ढगाळ वातावरण असायचे. नंतर ऊन, सावली अशी स्थिती होती. दुपारी काहीसे निरभ्र वातावरण तयार होत होते, यामुळे शेतीकामे गतीने सुरू होती. पण आता पाऊस सुरू झाल्याने खराब रस्त्यांच्या क्षेत्रातील केळी उत्पादकांमध्ये भीती वाढली आहे. हवामानशास्त्र विभागाने सर्वसाधारण पाऊस पुढे असणार आहे, असे म्हटले आहे.

यामुळे कापूस, केळी, उडीद, मूग, सोयाबीन उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. खानदेशात केळी उत्पादक पक्व झालेली केळी खराब वातावरणामुळे काढणी करून घेत आहेत. मध्यंतरी सहा - सात दिवस पाऊस नसल्याने केळी पक्व होण्याची क्रियाही गतीने सुरू होती. आता ऊन नसल्याने काढणी, मळणी, कापणी, वाहतुकीच्या कामाला अडचण येत आहे.

गेले दोन जोरदार ते मध्यम पाऊस धुळे, शिंदखेडा, जळगाव, एरंडोल, धरणगाव भागात झाला आहे. जळगावातील यावल, रावेर, बोदवड भागात पाऊस नव्हता. परंतु ढगाळ, पावसाळी वातावरण सर्वत्र आहे. शेतकरी केळी पिकातील वाफसादेखील कायम राहावा, अशी अपेक्षा करीत असून सिंचन बंद केले आहे. सिंचन करण्यासाठी पाणी मुबलक आहे.

पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या

सततच्या पावसाने कापूस, उडीद, मूग, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले. उडीद, मुगाला अनेक भागांत कोंबही फुटले होते. उडीद, मूग मळणीची कार्यवाही होऊ शकत नव्हती. मळणी करण्याची गरज असतानाच पाऊस आला. यात नुकसान झाले. आता पुन्हा पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कापूस वेचणीलाही गती आली होती. परंतु पावसाने वेचणी ठप्प होणार आहे. कापूस वेचून साठवणूक करण्याची कार्यवाहीदेखील अनेक भागात थांबली आहे. कारण वेचणीसाठी वाफसा, काहीसे हवेशीर वातावरण हवे असते. कापूस पिकाची हानी मागील हंगामात कमी पावसाने झाली, यंदा अति पावसात कापूस पिकाला फटका बसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT