Crop Damage Flood Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : ओला दुष्काळ जाहीर करून पीकविमा मंजूर करावा

Wet Drought : सप्टेंबरमधील अतिवृष्टी तसेच सततचा पाऊस यामुळे नांदेड जिल्ह्यातील जिरायती पिकांसह फळबाग व बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Nanded News : सप्टेंबरमधील अतिवृष्टी तसेच सततचा पाऊस यामुळे नांदेड जिल्ह्यातील जिरायती पिकांसह फळबाग व बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करुन पीकविमा मंजूर करावा.

तसेच सोयाबीनला हेक्टरी एक लाख तर फळबागेसाठी हेक्टरी दोन लाखांची भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली.

जिल्ह्यात आजपर्यंतच्या सरासरी पर्जन्यमानाच्या ११५ टक्के पाऊस झाल्यामुळे तसेच मागील आठवड्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीने काढणीस आलेल्या मुगाचे व सोबतच काढणीसाठी येणाऱ्या सोयाबीन, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्यासोबतच अर्धापूर तालुक्यात सरासरीच्या १५० टक्के पाऊस झाल्यामुळे बागायती नगदी पिके असणाऱ्या ऊस, केळी, हळद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासोबतच नदीच्या काठावरील सर्वच पिके नष्ट झाली आहेत.

जमिनी खरडून गेल्यामुळे जमिनीचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरसकट नुकसान ग्राह्य धरून तातडीने पीकविमा मंजूर करण्यात यावा तसेच सोयाबीनला हेक्टरी एक लाख, फळबागेला हेक्टरी दोन लाख रुपये आर्थिक मदत मिळावी, ऊस, केळी, हळद नगदी पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे त्यांचे संपूर्ण पीककर्ज माफ करण्यात यावे, ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज नाही अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Drill Subsidy: हिंगणघाट बाजार समिती देणार अनुदानावर पेरणी यंत्र

Farmer Insurance App Issue: ॲप, टोल फ्री नंबरवर तक्रारीची नोंद होईना!

Avocado Farming Success: दिवे येथे अ‍ॅव्होकॅडो फळपीक उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

Farmer Death: कसमादे पट्ट्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Sugar Industry Growth: साखर उद्योगाला चालना मिळणार

SCROLL FOR NEXT