Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : स्वित्झर्लंडच्या कृषी तज्ज्ञांनी जाणली पीकविमा कार्यपद्धती

Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीकविमा योजनेद्वारे नैसर्गिक आपत्तीच्या काळात पीक संरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Team Agrowon

Nagpur News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत आयसीआयसीआय लोंबार्ड या विमा कंपनीस पुनर्वित्तीय साह्य करणाऱ्या स्वित्झर्लंड येथील एक्‍सीस या कंपनीचे कृषी प्रमुख मायकल लिहे आणि विल्लेमिजन ऱ्होज यांनी नागपूर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयास भेट दिली. यावेळी ‘एसएओ’ रवींद्र मनोहरे यांच्या माध्यमातून त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती जाणून घेतली.

पंतप्रधान पीकविमा योजनेद्वारे नैसर्गिक आपत्तीच्या काळात पीक संरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात देखील या योजनेची अंमलबजावणी होत असली तरी योजनेत अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे अपेक्षित भरपाई मिळत नसल्याचा आरोप शेतकरी स्तरावर सातत्याने होतो.

त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान पीकविमा योजना नेमकी कशी आहे, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने स्वीर्त्झंलड येथील लिहे व ऱ्होज यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी श्री. मनोहरे यांनी त्यांचे स्वागत केले.

या वेळी एसीई इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लि. नवी दिल्लीचे व्यवस्थापक सूरज गब्बी, आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीचे मुख्य व्यवस्थापक नमन वर्मा, जिल्हा व्यवस्थापक राहुल सनानसे, तंत्र अधिकारी सुवर्णा माळी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पंतप्रधान पीकविमा योजनेची कार्यपद्धती, पीक कापणी प्रयोगाचे कार्यान्वयन आणि प्रत्यक्ष कामकाजात येत असलेल्या अडचणी या विषयावर मनोहरे यांनी माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT