Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Insurance : ‘रब्बी’तही शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा

Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीकविमा योजना रब्बी हंगाम २०२३ मध्येही राज्यात पीकविमा एक रुपयांमध्ये भरून मिळणार आहे. शेतकऱ्यांना रब्बीतील गहू, ज्वारी, उन्हाळी भुईमूग, हरभरा या पिकांसाठी विमाहप्ता भरता येणार आहे.

Team Agrowon

Solapur News : पंतप्रधान पीकविमा योजना रब्बी हंगाम २०२३ मध्येही राज्यात पीकविमा एक रुपयांमध्ये भरून मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बीतील गहू, ज्वारी, उन्हाळी भुईमूग, हरभरा या पिकांसाठी विमाहप्ता भरता येणार आहे. शेतकऱ्यांनी तो भरावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामासाठी गहू (बागायत) पिकासाठी रक्कम ३३ हजार रुपये, ज्वारी (बागायत) पिकासाठी रक्कम ३२ हजार ५०० रुपये व ज्वारी (जिरायत) पिकासाठी रक्कम २३ हजार रुपये, हरभरा पिकासाठी ३० हजार रुपये, उन्हाळी भुईमूग पिकासाठी रक्कम ४० हजार रुपये, रब्बी कांदा पिकासाठी ६५ हजार रुपये एवढी विमा संरक्षित रक्कम आहे. विमा भरण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा व आठ अ उतारे स्वयंघोषणापत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर, कांद्यासाठी १५ डिसेंबरची मुदत

विमा संरक्षणाच्या बाबींमध्ये पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पादनात येणारी घट ही विचारात घेतली जाते. त्यानुसार भरपाई मिळते. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी रब्बी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर, गहू, हरभरा, कांदा पिकासाठी १५ डिसेंबर, तर उन्हाळी भुईमूग पिकासाठी ३१ मार्च अंतिम मुदत असेल, अशी माहिती मिळाली.

...अशी मिळणार भरपाई

पीक पेरणीपूर्व किंवा लागवणपूर्व नुकसानीमध्ये अपुरा पाऊस हवामानातील इतर प्रतिकूल घटकांमुळे अधिसूचित पिकाची त्या भागातील सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी लागवड होऊ शकली नाही तर विमा संरक्षण मिळणार आहे.

हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पूर पावसातील खंड दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात उंबरठा उत्पादनाच्या ५० टक्क्यांहून अधिक घट अपेक्षित असेल, तर विमा संरक्षण मिळणार आहे.

काढणीपश्‍चात चक्रीवादळ अवेळी पाऊस यामुळे कापणी किंवा काढणीनंतर सुकविण्यासाठी शेतात पसरून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाईल.

काढणीपश्‍चात नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी पिकांचे आकस्मिक नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत याबाबत केंद्र शासनाच्या पीकविमा ॲपवर संबंधित विमा कंपनी कृषी किंवा महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांकाद्वारे कळवावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women in Agriculture : पुसा येथे जागतिक शेतकरी महिला परिषदेचे आयोजन; राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता

India Exports To China: भारताची चीनमध्ये निर्यात ३३ टक्क्यांनी वाढली, शेतमाल, सागरी उत्पादनांचा समावेश

Agriculture Exhibition 2026: यांत्रिकीकरणासह नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाने वेधले लक्ष

Solar Power Project: जालन्यात ३४१ मेगावॉट क्षमतेचे ७१ प्रकल्प मंजूर

Agrowon Exhibition 2026: कृषी उद्योग विकास महामंडळाचा महाअॅग्रो मार्ट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म

SCROLL FOR NEXT