Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड

Crop Insurance Compensation : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यावी, जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.

 गोपाल हागे

Akola News : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची प्रशासन व शासनाकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आंदोलक शिवसैनिकांनी गुरुवारी (ता. ९) पीकविमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यावी, जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ५२ महसूल मंडलांपैकी ३४ मंडले अतिवृष्टीत बाधित झाली. अन्य मंडलांमध्येही अतिवृष्टी आणि पुराच्या जबर तडाख्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला.

१ लाख ६८ हजार ९३७.१ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले होते. नुकसानीपोटी शासनाने १६४ कोटींची मदत मंजूर केली. मात्र, रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानाचा मदत मिळालेली नाही.

त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी उपोषण सुरू केले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षासह विविध संस्था संघटनाकडून त्यास पाठिंबा मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT