Fruit Crop Insurance : फळपीक विमाधारकांना १२ टक्के व्याजासह परतावे द्या

Crop Insurance Scheme : हे परतावे विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत केळी विमाधारकांना मिळणे अपेक्षित होते. परंतु परतावे न मिळाल्याने आता नियमानुसार विमाधारकांना १२ टक्के व्याजासह हे परतावे दिले जावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना परतावे प्राप्त झालेले नाहीत. हे परतावे विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत केळी विमाधारकांना मिळणे अपेक्षित होते. परंतु परतावे न मिळाल्याने आता नियमानुसार विमाधारकांना १२ टक्के व्याजासह हे परतावे दिले जावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

जिल्ह्यातील सुमारे ७७ हजार ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी फळ पीकविमा योजनेतून केळी पिकासाठी ऑक्टोबर २०२२ मध्ये विमा संरक्षण घेतले होते. हे विमा संरक्षण १ नोव्हेंबर २०२२ ते ३१ जुलै २०२३ या नऊ महिन्यांसाठी होते. हा विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत म्हणजेच १५ सप्टेंबरपर्यंत हे परतावे पात्र विमाधारकांना मिळणे अपेक्षित होते.

Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance : नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार फळपीक विमा परतावा

परंतु परतावे कुणालाही मिळालेलेले नाहीत. हे परतावे लवकरच देऊ, अशी बतावणी विमा कंपनी व कृषी विभाग करीत आहे. यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. कारण पात्र विमाधारकांच्या याद्या, परतावा निधी बँकांत आला आहे की नाही, याबाबत कुणीही स्पष्टपणे सांगत नाही.

परताव्यांना ५२ दिवसांचा विलंब झाला आहे. वेळेत परतावे न मिळाल्यास शेतकऱ्यांना १२ टक्के व्याजासह हे परतावे देणे विमा कंपनीला बंधनकारक आहेत. यामुळे १२ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना हे परतावे दिले जावेत, अशी मागणी शेतकरी, विमाधारक करीत आहेत.

Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance : शेतकऱ्यांना लवकरच फळ पीकविमा योजनेचे परतावे मिळणार

पीकविमा योजना विमा कंपनीच्या फायद्यासाठीच चालविली जात आहे. ज्या वेळी शेतकऱ्यांचा लाभ होताना दिसतो, त्या वेळी नियम, कायदे, अटी विमा कंपनी व कृषी विभाग पुढे करतो. हेच नियम विमा कंपनी व शासनालाही लागू आहेत.

कृषी विभागाच्या आडमुठेपणा व नसत्या बाबी उकरण्याच्या प्रकारामुळे जिल्ह्यातील प्रामाणिक शेतकऱ्यांना हकनाक त्रास होत आहे, असा मुद्दाही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com