Peak Vima Farmer agrowon
ॲग्रो विशेष

Pik Vima Farmer : पीक विमा कंपन्यांमुळे शेतकऱ्यांच्या दसरा-दिवाळीवर विरजण, २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यास नकार

Crop Damage Farmers : पावसात खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याबाबत विमा कंपनीला निर्देश दिले होते.

sandeep Shirguppe

Maharashtra Peak Vima News : पावसात खंड पडल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याबाबत विमा कंपनीला निर्देश दिले होते. परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी पीक विम्यापोटीची २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यास नकार दिल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. पीक विमा कंपन्यांचा असाच पवित्रा कायम राहिल्यास सरकारला शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषास तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे कंपन्यांनी फेटाळले असून त्यांना विम्यापोटी देण्यात येणारी २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यास नकार दिला आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

विमा कंपनीच्या नियमाप्रमाणे अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास विमा रकमेपैकी २५ टक्के रक्कम संबंधित नुकसानग्रस्त विमा धारक शेतकऱ्यास आगाऊ देणे बंधनकारक आहे. राज्यातील ३० जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पीक विमा कंपन्यांना याबाबत पात्र पाठविले आहे.

पूर, पावसातील खंड, दुष्काळ, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आदी बाबींमुळे शेतकऱ्यांना चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये मागील ७ वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे.

याबाबत अधिसूचना जिल्हास्तरीय संयुक्त समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांना काढण्याचे अधिकार मिळालेले आहे. त्याचा वापर करीत जिल्हाधिकारी यांनी विमा कंपन्यांना निर्देश दिले आहेत.

यंदा पावसात २१ दिवसांपेक्षा जास्त पडलेला खंड व इतर प्रतिकूल नैसर्गिक स्थितीमुळे पिकांचे नुकसान पाहता जिल्हा प्रशासनाने विमा कंपनीला २५ टक्के रक्कम आगाऊ देण्याचे निर्देश दिले होते. पण तेच अमान्य करीत कंपनीने अपील दाखल केल्याने आता दसरा-दिवाळीत अपेक्षित असणारी संभाव्य मदत लटकल्याचे बोलले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

SCROLL FOR NEXT