Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Advance Crop Insurance : अमरावती जिल्ह्यातील ४१ महसूल मंडलांत मिळणार अग्रीम

Latest Agriculture News : महिन्याभरात या शेतकऱ्यांना अग्रीम देण्यास विमा कंपनीस आदेश देण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिल्याने दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू करण्यात आला आहे.

Team Agrowon

Amaravati News : जिल्ह्यातील सात तालुक्यांतील ४१ महसूल मंडलांत सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट अपेक्षित करण्यात आली आहे. त्यामुळे या महसूल मंडलातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा परताव्याचा २५ टक्के अग्रीम देण्याची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढली आहे.

महिन्याभरात या शेतकऱ्यांना अग्रीम देण्यास विमा कंपनीस आदेश देण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिल्याने दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांत संयुक्त समितीकडून सोयाबीन पिकाचे सर्वेक्षण करण्यात आले.

त्यामध्ये दर्यापूर, अंजनगावसुर्जी, भातकुली, धामणगावरेल्वे, चिखलदरा, चांदूररेल्वे व धारणी या तालुक्यांतील ४१ महसूल मंडलांत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झाल्याचे व सरासरी उत्पादनात गत सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

संयुक्त समितीचा अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के अग्रीम विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेश काढले आहेत.

तालुकानिहाय महसूल मंडळ

दर्यापूर : येवदा, वडनेरगंगाई, रामतीर्थ, दर्यापूर, सामदा, थिलोरी, खल्लार, दारापूर

अंजनगावसुर्जी : अंजनगाव, सातेगाव, भंडारज, विहीगाव, कापूसतळणी, कोकर्डा

भातकुली : आष्टी, खोलापूर, पूर्णानगर, भातकुली, निंभा, आसरा

धामणगावरेल्वे : धामणगावरेल्वे, अंजनसिंगी, तळेगाव दशासर, दत्तापूर, मंगरूळ दस्तगीर, चिंचोली, भातकुली

चिखलदरा : टेंभ्रुसोंडा, चुरणी, गौलखेडा बाजार, हतरू

चांदूररेल्वे : चांदूररेल्वे, आमला विश्वेश्वर, घुईखेड, पळसखेड, सातेफळ

धारणी : धारणी, सावलीखेडा, धूळघाट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT