Crop Insurance : संयुक्त सर्वेक्षण अहवालानुसार जिल्ह्यात पीकविम्याचा परतावा

Kharif Season : जिल्ह्यातील उर्वरित महसूल मंडळे/तालुक्यांमध्ये सुद्धा ३ आठवड्यांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला होता.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

Solapur News : प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२३ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात माहे जुलै - ऑगस्टमध्ये काही महसूल मंडलांमध्ये पावसात खंड पडलेला असल्याने खरीप ज्वारी, सोयाबीन, तूर, भुईमूग, मका, बाजरी कांदा, कापूस या पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्‍यता लक्षात घेता, हंगाम कालावधीत प्रतिकूल परिस्थितीच्या अनुषंगाने पावसाचा खंड ३ ते ४ आठवडे असलेल्या अधिसूचित तालुका/मंडलामध्ये सर्वेक्षण करण्यात येऊन त्याअनुषंगाने ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादनात घट असलेल्या पिकांसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आली असल्याने त्यानुसार नुकसान भरपाई मिळणार, असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले.

श्री. गावसाने म्हणाले, की शेतकऱ्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये गत सात वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल, तर सदर अधिसूचित महसूल मंडळ/अधिसूचित तालुका पात्र राहतील व उंबरठा उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्‍कम देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील उर्वरित महसूल मंडळे/तालुक्यांमध्ये सुद्धा ३ आठवड्यांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला होता.

Crop Insurance
Fruit Crop Insurance : फळ पीकविमा योजनेबाबत शासनाचा दुटप्पीपणा

या दरम्यान मध्यंतरी एखाद दुसरा दिवस अत्यंत किरकोळ प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पावसाच्या खंडामध्ये तांत्रिक खंड पडलेला आहे. सदर महसूल मंडलामध्ये सुद्धा पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून, त्यामध्ये सुद्धा सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याने सदर महसूल मंडले/तालुके यांचे सुद्धा सर्वेक्षण करून विशेष बाब म्हणून नुकसानभरपाई देण्याबाबतची मागणी होत होती.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविम्यात घोटाळ्यांचा सुकाळ, अग्रीमबाबतही अफवा; विमा कंपन्यांनी खरंच अग्रीम भरपाई नाकारली का?

त्यानुसार जिल्हातील उर्वरित महसूल मंडले /तालुक्यामध्ये पिकांच्या नुकसानीबाबत संयुक्त सर्वेक्षण करण्यात येणार आहे. संयुक्त सर्वेक्षण अहवालानुसार अधिसूचित पिकांची उत्पादकता मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा कमी आल्यास महसूल मंडले/तालुक्यातील सुमारे एक लाख शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतील तरतुदीनुसार नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री. गावसाने यांनी सांगितले.

सर्वेक्षण करण्यात येणारे तालुके...

बार्शी तालुक्यातील बार्शी ब खांडवी, सांगोला तालुक्यातील सांगोला, हतीद, सोनंद, नाझरा व संगेवाडी, मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, मरबडे व भोसे, मोहोळ तालुक्यातील पेनूर व मोहोळ, करमाळा तालुक्यातील जेऊर व उमरड, पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव, माळशिरस तालुक्यातील महाळुंग व पिलीव या मंडलांचा तसेच बार्शी, सांगोला व मंगळवेढा या अधिसूचित तालुक्यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com