Rabi Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Demonstration : तेलबिया उत्पादनाचे रब्बीत १७,८०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके

Oilseed Production : रब्बी हंगामात प्राधान्याने तेलबियांचे शेतकऱ्यांनी उत्पादन घ्यावे यासाठी राज्यातील १९ जिल्ह्यांत करडई, तीळ, भुईमुगाचे मिळून १७ हजार ८०० हेक्टर पीक प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News : रब्बी हंगामात प्राधान्याने तेलबियांचे शेतकऱ्यांनी उत्पादन घ्यावे यासाठी राज्यातील १९ जिल्ह्यांत करडई, तीळ, भुईमुगाचे मिळून १७ हजार ८०० हेक्टर पीक प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत. राष्ट्रीय खाद्य तेल अभियान (गळीतधान्य) व राज्य पुरस्कृत सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास विशेष कृती योजनेतून ही प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. यात करडई पीक प्रात्यक्षिकाला प्राधान्य असून सोळा हजार हेक्टरवर करडईचे प्रात्यक्षिके असतील. यावर जवळपास पावणे आठ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

रब्बीत प्रामुख्याने ज्वारी, हरभरा, गहू, मका ही पिके घेतली जातात. ज्वारी हे रब्बीतील महत्त्वाचे पीक मानले जाते. अनेक भागांत ज्वारीसोबत करडईचे पीक घेतले जात होते. मात्र मागणी असूनही ज्वारीसह करडईचेही क्षेत्र कमी झाले आहे. सध्या राज्यात करडईचे केवळ २६ हजार ६५१ हेक्टर सरासरी क्षेत्र असून तिळाचे १४२९, तर भुईमुगाचेही सरासरी क्षेत्र आठ हजारांच्या आत आहे.

करडईसह तीळ, भुईमुगाची रब्बीत फारशी पेरणी होत नसल्याने कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून तेलबिया क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी राष्ट्रीय खाद्य तेल अभियान व राज्य पुरस्कृत सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास विशेष कृती योजनेतून प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. यंदा भुईमुगाचे दोन्ही योजनांतून साडेतीन हजार हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके होत प्रती हेक्टरवर १० हजार रुपये खर्च होणार असल्याने त्यावर ३ कोटी ६० लाख खर्च होणार आहेत.

तिळाचे ३०० हेक्टरवर पीकप्रात्यक्षिक होणार असून, प्रति हेक्टर ३ हजार रुपयांप्रमाणे ९० लाख रुपये खर्च होणार आहे. यामध्ये करडईला प्राधान्य दिले असून, करडईचे १४ हजार हेक्टरवर प्रात्यक्षिके घेतली जाणार असल्याने प्रति हेक्टर ३ हजार याप्रमाणे ४ कोटी २० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. सहभागी शेतकऱ्यांना बियाणे व आवश्यक निविष्ठा मोफत दिल्या जातात.

खरिपातही भुईमुगाची ५ हजार हेक्टरवर प्रात्यक्षिके राबवली. तर पावणेचार कोटी खर्च केला. अनेक भागांत भुईमुगाचे बियाणे उपलब्ध न झाल्याने भुईमुगाऐवजी सूर्यफुलाची पीक प्रात्यक्षिके राबवली आहेत. खरिपात सोयाबानचीही ७५ हजार हेक्टरवर प्रात्यक्षिके राबवून ४५ कोटी खर्च केला आहे. रब्बीत तेलबिया वाढीसाठी पीक प्रात्यक्षिके घेतली जात असली तरी ती कितपत यशस्वी होतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

करडईचे जिल्हानिहाय प्रात्यक्षिके (हेक्टर)

अहिल्यानगर : २२० पुणे : १५, सांगली : २२५, बीड : ६५०, लातूर : ४३२०, धाराशिव : ४०३०, नांदेड : १५३०, हिंगोली : १३०, परभणी : २१००, बुलडाणा : ७०, अकोला : १६५, वाशीम : २४०, अमरावती : ३५, चंद्रपूर : २७०.

भुईमुगाचे दोन्ही योजनांतील प्रात्यक्षिके (हेक्टर)

नाशिक : ४९०, धुळे : २२०, नंदुरबार : २५, अहिल्यानगर : १९५, पुणे : २६०, सांगली : ६६०, सोलापूर : ५०, सातारा : ४००, बीड : ७५, छत्रपती संभाजीनगर : १००, कोल्हापूर : ५००, जालना : २५, लातूर : २०, धाराशिव : ७०, नांदेड : ८०, हिंगोली : ५०, परभणी : ६०, बुलडाणा : ४०, अकोला : ४०, वाशीम : २०, अमरावती : २०, यवतमाळ : ८०, वर्धा : २०, नागपूर : २०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mobile Slaughterhouses : अरुणाचल सरकार देणार मोबाइल स्लॉटर हाउसला प्रोत्साहन

Climate Change : हवामान बदलावर विचारमंथन करणारी ‘कॉप’

Jaggery Production Kolhapur : गुळाला भाव मिळतोय पण आवक घटली; गूळ उत्पादनावर विधानसभा निवडणुकीचा परिणाम

Pomegranate Farming : यंदा दोन्ही बहरांचे नियोजन करतोय!

Agriculture Warehouse : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

SCROLL FOR NEXT