Pune News : तेलबिया म्हणून ओळख असलेल्या सूर्यफूल पिकाकडे पुणे विभागातील शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. यंदा खरीप हंगामात सूर्यफुलाची सरासरीच्या नऊ हजार ३७४ हेक्टरपैकी अवघे ७ हजार ९४२ हेक्टर म्हणजेच सरासरी ७९ टक्के पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत एक हजार ४३२ हेक्टरने क्षेत्रात घट झाली आहे.
सध्या पिकाची अवस्था चांगली असली तरी अनेक ठिकाणी पिकाच्या फुलाची काढणी अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणी फुले काढणीस आली आहेत. येत्या दहा ते पंधरा दिवसांत या पिकांची काढणी पूर्ण होईल अशी शक्यता आहे. यंदा पाऊस चांगला असल्याने पिके जोमदार आली होती.
प्रामुख्याने सूर्यफुलाची खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात अनेक शेतकरी पेरणी करतात. त्यातच अधूनमधून बदललेल्या हवामानामुळे काही प्रमाणात रोग, कीडींचाही पिकांवर प्रादुर्भाव झाला होता. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तेलबियाविषयी चांगलीच जनजागृती केली जात आहे.
त्यामुळे पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. यंदा सर्वाधिक पेरणी ही एकट्या बारामती तालुक्यात झाली आहे. या तालुक्यात सरासरीच्या ५८ हेक्टरपैकी ५२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर पुरंदर, इंदापूर, दौड तालुक्यांतही तुरळक ठिकाणी पेरणी झाली होती.
सोलापूर जिल्ह्यातही सूर्यफूल पिकाचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यांत सूर्यफुलाची बऱ्यापैकी पेरणी झाली आहे. मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ अक्कलकोट, सांगोला तालुक्यात चांगली पेरणी झाली आहे.
सूर्यफुलाचे जिल्हानिहाय सरासरी क्षेत्र, झालेली पेरणी (हेक्टरमध्ये)
जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणी
नगर ३१२ २६३
पुणे ०.९९ ९०८
सोलापूर ८९६३ ६७७२
एकूण ९३७४ ७९४२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.