Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : नगर जिल्ह्यात अतिवृष्टीने सव्वापाच हजार हेक्टरवर नुकसान

Heavy Rain : नगर जिल्ह्यात यंदा खरिपाची स्थिती चांगली आहे. मात्र उडीद, मूग यांसारख्या पिकांची काढणी सुरू झालेली असताना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने खरिपातील सुमारे सव्वापाच हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. चार तालुक्यांतील ४० गावांतील सात हजार सहाशे ३३ शेतकऱ्यांच्या पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पावसाने मूग, उडदाचे अधिक नुकसान झाले आहे.

नगर जिल्ह्यात यंदा खरिपाची स्थिती चांगली आहे. मात्र उडीद, मूग यांसारख्या पिकांची काढणी सुरू झालेली असताना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यात सतत पाऊस लागून होता. दोन दिवस जोरदार पाऊस झाला. दोन दिवसांत सुमारे चाळीसपेक्षा अधिक मंडळात अतिवृष्टी झाला.

त्यात प्रामुख्याने राहुरी, जामखेड अकोले, नगर या तीन तालुक्यांत शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार २१ ते २५ ऑगस्ट या काळात झालेल्या अतिवृष्टी, जोरदार व सततच्या पावसामुळे कांदा, मूग आणि उडदाचे नुकसान झाले आहे. नगर तालुक्यात सर्वाधिक फटका बसला असून नगर तालुक्यात २७ गावांत ६ हजार ४५१ शेतकऱ्यांचे ४ हजार ४५१ हेक्टरवर कापूस, बाजरी, मुगाचे नुकसान झाले आहे.

जामखेड तालुक्यात ९६८ शेतकऱ्यांचे ७०३ हेक्टरवर उडीद, सोयाबीन, कांद्याचे नुकसान झाले आहे. राहुरी तालुक्यातील २ गावांत ९४ शेतकऱ्यांचे ६६ हेक्टरवर तर अकोले तालुक्यात ११९ शेतकऱ्यांचे ३३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांना फटका

एकूण झालेल्या सुमारे सव्वापाच हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीपैकी चार हजार १६० हेक्टरवरील नुकसान हे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अतिवृष्टी किंवा सततचा पाऊस यामुळे पिकांचे नुकसान झाले असल्यास ३३ टक्क्‍यांपेक्षा अधिक नुकसान असलेल्या बाबीलाच नुकसान भरपाई दिली जाते. ३३ टक्क्यांच्या आत झालेले नुकसान भरपाई दिले जात नसल्याने त्याचा मोठा फटका अनेक शेतकऱ्यांना बसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT