Crop Damage : अकोल्यात जून, जुलैत यंदा साडेनऊ हजार हेक्टरवर नुकसान

Heavy Rain Crop Damage : १० हजार ४७२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Akola News : जिल्ह्यात या हंगामात जून, जुलै महिन्यांत अतिवृष्टीमुळे शेती व फळ पिकांचे सुमारे नऊ हजार ४६१ हेक्टरवर नुकसान झाले आहे. याबाबतचा अंतिम अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला असून शेतकऱ्यांना १२ कोटी ८६ लाख ७४ हजार रुपये निधी लागणार आहे. १० हजार ४७२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान झाले. त्यावेळी तातडीने सर्वेक्षण करण्यात आले. या नुकसानाचा तालुकानिहाय अहवाल तयार करण्यात आला. यात सर्वाधिक बाधित क्षेत्र अकोला तालुक्याचे ६,२४१ हेक्टर एवढे आहे. यात ६,६३३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

Crop Damage
Crop Damage : काढणीला आलेल्या मुगाचे पावसाने नुकसान

१,३८७ हेक्टर सोयाबीन, ४,२७२ हेक्टर कपाशी, ५०० हेक्टर तूर पिकाचा समावेश आहे. पातूर तालुक्यात १००८ शेतकऱ्यांचे १४१७ हेक्टर सोयाबीन, २०६ हेक्टर तुरीचे नुकसान आहे. बार्शीटाकळी तालुक्यात २३४९ शेतकऱ्यांचे १११९ हेक्टर सोयाबीन, ११८ हेक्टर कपाशी, १८५ हेक्टर तूर पिकाचा समावेश आहे. मूर्तिजापूरमध्ये ४७१ शेतकऱ्यांचे १०७ हेक्टर सोयाबीन, ११.२२ हेक्टर तुरीच्या पिकाचे नुकसान दर्शविण्यात आले आहे.

Crop Damage
Crop Damage : पाऊस, वाऱ्यामुळे बाजरी पिकाचे नुकसान

१३ कोटींची गरज

सुमारे साडेनऊ हजार हेक्टरवर झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांप्रमाणे सुमारे १२ कोटी ८६ लाख ७४ हजार ६३२ रुपये निधीची आवश्‍यकता असल्‍याचे या अंतिम अहवालात म्हटले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल पाठवण्यात आला.

३३ टक्क्यांवर नुकसान झालेले क्षेत्र

गावे शेतकरी संख्या सोयाबीन कपाशी तूर एकूण

१४८ १०,४७२ ४,०३१ ४,३९९ ९०३ ९,४६१ हेक्टर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com