Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यात १२,७०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान

Heavy Rain Crop Loss : जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात १२ हजार ७५७ हेक्टरमधील शेतपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून १५ हजार ३३२ शेतकरी बाधित झाले.

Team Agrowon

Nagpur News : जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात १२ हजार ७५७ हेक्टरमधील शेतपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून १५ हजार ३३२ शेतकरी बाधित झाले. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १८ कोटी ३६ लाख ५५ हजार रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनास पाठविण्यात आला आहे.

यंदा पाऊस आतापर्यंतच सरासरी गाठली. अनेकदा अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या घराचे नुकसान झाला. शेतपिकांचेही पावसामुळे मोठे नुकसान झाले. जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली. ऑगस्ट महिन्यातही चांगला पाऊस झाला. याचा शेतपिकांवर उलट परिणाम होत आहे.

सोयाबीन, कापसावर रोगाची लागण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे सर्वाधिक ५ हजार २८१ हेक्टरमध्ये नुकसान कुही तालुक्यात आहे. तर उमरेड तालुक्यात ३ हजार २६२ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाले.

त्या पाठोपाठ भिवापूर तालुक्यात २ हजार ४३ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचे समोर आले. नागपूर ग्रामीणमध्‍ये ६५ हेक्टर, हिंगण्यात ४, मौदा तालुक्यात ७६६, कामठी तालुक्यात ९३६, रामटेक तालुक्यात १०, पारशिवनी तालुक्यात ३१०, तर सावनेरमध्ये ७५ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे.

अहवालास विलंब

जुलै महिन्यात झालेल्या नुकसानाचा अहवाल आता या महिन्यात आला. ई-पीक पंचनामाच्या माध्यमातून तत्काळ नुकसानाची माहिती मिळेल व शासनास प्रस्ताव पाठविणे सोयीचे होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानाची मदत लवकर मिळण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. परंतु जुलै महिन्यातील नुकसानीचा अहवाल सप्टेंबर महिन्यात पाठविण्यात आल्याने ई-पीक पंचनाम्याच्या गतीवर प्रश्न निर्माण केल्या जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT