Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : कालव्याचे पाणी शेतात साचल्यामुळे पिकाचे नुकसान

Water Logging : सतत पाणी साचून राहल्यामुळे उभे पीक सडून गेले आहे. तसेच कालव्याचे कामही अर्धवट झाले आहे.

Team Agrowon

Washim News : कालव्याचे पाणी शेतात साचल्यामुळे उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने शेतीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने तहसीलदार व लघू पाटबंधारे उपविभागाच्या अभियंत्यांकडे केली आहे.

याबाबत भोकरखेड येथील शेतकरी प्रभू संभाजी रंजवे यांनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की भोकरखेड शेत शिवारात गट नं. ५९ मध्ये २.०२ आर एवढी त्यांची शेती आहे. जवळच असलेल्या पळसखेड येथील लघू पाटबंधारे धरणाचा डावा कालवा या शेतामधून गेला आहे. या धरणाच्या दोन्ही कालव्यांचे काम अर्धवट झालेले आहे.

शेतातून गेलेल्या डाव्या कालव्याचे खोदकाम ‘एल’ या इंग्रजी अक्षराप्रमाणे केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या शेतात सध्या अडीच ते तीन फूट पाणी साचले आहे. सतत पाणी साचून राहल्यामुळे उभे पीक सडून गेले आहे.

तसेच कालव्याचे कामही अर्धवट झाले आहे. पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांनी संबंधित विभागाच्या अभियंत्याला व ठेकेदाराला वारंवार सांगूनही त्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले. कालव्याचे पाणी शेतात साचल्यामुळे संपूर्ण शेतातील सोयाबीन व तूर पिकाची नासाडी झाली आहे.

झालेल्या नुकसानीला संबंधित विभाग जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी प्रभू रंजवे यांनी केला आहे. नुकसानग्रस्त शेतीची संबंधितांनी पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी रंजवे यांनी केली आहे.

माझ्याकडे दोन हेक्टर शेती आहे. कालव्याचे पाणी संपूर्ण शेतात साचून असल्यामुळे सोयाबीन व तूर सडले आहे. माझ्या शेताची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी.
- प्रभु संभाजी रंजवे, शेतकरी, भोकरखेडा, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT