Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Unseasonal Rain : एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस गारपिटीमुळे आतापर्यंत जवळपास एक हजार हेक्टरवरील पिकांची नासधूस झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

माणिक रासवे

Yavatmal News : एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस गारपिटीमुळे आतापर्यंत जवळपास एक हजार हेक्टरवरील पिकांची नासधूस झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. पावसाने तीळ, ज्वारी, भाजीपाला आदींसह आंबा, पपई, केळीचे नुकसान केले आहे.

एप्रिल महिन्यात भर उन्हाळ्यात थंड, गरम अशा दुहेरी वातावरणाचा अनुभव नागरिकांना येत आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाची दररोज हजेरी आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. खरीप, रब्बीनंतर आता उन्हाळी पिकांवरही अवकाळीची संक्रांत आली आहे.

ज्वारी, तीळ, गहू, भुईमूग, भाजीपाला, आंबा, पपई, केळी, संत्रा, मोसंबी आदी फळबागावरही वादळी वाऱ्यांचा परिणाम झाला आहे. फळपीक गळून पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आंबा शेतकऱ्यांच्या घरात येण्याचा मार्गावर असताना झालेल्या वादळीवाऱ्याने आंबा पडला आहे.

वाऱ्यामुळे केळी, पपईची बाग उद्ध्वस्त झाली आहे. सर्वाधिक फटका तीळ तसेच ज्वारी पिकाला बसला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. पावसामुळे खरीप, रब्बी, उन्हाळी असे तीनही हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे.

सातत्याने होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अशातच अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीने आणखी भर पडली आहे. चार दिवसांत एक हजार हेक्टरवर क्षेत्राला फटका बसला आहे. त्यामुळे आता तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

एकाच दिवशी पाचशे हेक्टरचे नुकसान

जिल्ह्यात शुक्रवारपासून (ता. २६ एप्रिल) दररोज रात्री पावसाची हजेरी आहे. पावसाने आतापर्यंत शेतीमालाचे नुकसान झाले आहे. सोमवारी (ता. २९ एप्रिल) झालेल्या पावसाने तब्बल पाचशे हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यंदा ३९ हजार हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT