Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पावसामुळे नुकसान

Crop Damage : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात शुक्रवारी (ता.१०) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पूर्व मोसमी पाऊस झाला.

Team Agrowon

Pargaon News : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात शुक्रवारी (ता.१०) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पूर्व मोसमी पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली.

वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या पडून व उन्हाळी बाजरीचे पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

तालुक्याच्या पूर्व भागात अवसरी बुद्रुक, टाव्हरेवाडी, धामणी, शिरदाळे, पहाडदरा, लोणी परिसरांत शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली.

वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या पडून व उन्हाळी बाजरीच्या उभे पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शिरदाळेचे माजी उपसरपंच मयूर सरडे यांनी दिली.

मेंगडेवाडी, जारकरवाडी, खडकवाडी परिसरात तुरळक पाऊस झाला. पावसामुळे हवामानात आल्हददाय गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agripreneurship MOU: कृषी विद्यापीठ, सह्याद्री फार्म्समध्ये करार

Jalalakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी प्रवाही योजनेचा २३ गावांतील शेतीला लाभ

Tiger Attack Compensation: सोनवणे कुटुंबाला १० लाखांचा धनादेश

Solapur Development Projects: वारी, कॉरिडॉर, आयटी पार्कला ‘टॉप प्रायोरिटी’

Sugarcane Payments Pending: उसाचे पेमेंट न मिळाल्याने शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT