Hailstorm Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Hailstorm : नांदेडला गारपिटीचा तडाखा

Crop Damage : जिल्ह्यात हिमायतनगर, मुदखेड, उमरी, हदगाव, भोकर तालुक्यात रविवारी (ता. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : जिल्ह्यात हिमायतनगर, मुदखेड, उमरी, हदगाव, भोकर तालुक्यात रविवारी (ता. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. पावसादरम्यान अनेक भागात गारपीट झाल्याने रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. या दरम्यान मुदखेड तालुक्यात वीज पडून एका २२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

नांदेड जिल्ह्यात रविवारी (ता. ११) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. यामुळे कमाल तापमानात घट झाली होती. दुपारनंतर ढग जमा होऊन पावसाचे वातावरण तयार झाले. पाचच्या सुमारास जिल्ह्यातील हिमायतनगर, मुदखेड, उमरी, हदगाव, भोकर या तालुक्यांत जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

याचवेळी उमरी तालुक्यातील कळगाव, गोरठा, ईश्‍वरनगर तांडा, सोमठाणा, हिमायतनगर तालुक्यातील खडकी, टेंभी घारापूर, जवळगाव, पोटा, कामारी, सरसम, मांडली, आंदेगाव, वटफळी, दुधड, सिरंजनी या गावांना गारांचा तडाखा बसला. किनवट तालुक्यातील धामणदरी, शिवणी, भोकर तालुक्यांतील मोघाळी, कामनगाव, किनी, थेरबन, हाडोळी वादळी वारे व गारांच्या माऱ्यामुळे काढणीला आलेल्या हरभरा, गहू, रब्बी ज्वारी व आंब्याच्या मोहराचे नुकसान झाले आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे शेतात कामावर असलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अनेकांनी आसरा शोधण्याचा प्रयत्न केला. गारपिटीमुळे वातावरणात गारवा जाणवू लागला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी सोमवारीही (ता.१२) जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला नसला तरी शेतकरी मात्र सावध झाले आहेत. कृषी विभागाकडून नुकसानीची प्राथमिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाच्या सूत्राने सांगितले.

वीज पडून तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू

मुदखेड तालुक्यातील पिंपळकोठा (चोर) येथेही अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी शेतातून घराकडे निघालेल्या दत्ता दिगंबर वाघमारे (वय २२) या तरुणाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास घटली. या प्रकरणी मुदखेड तहसीलकडून नोंद घेण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT