Elephant Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Animal Crop Damage : आजऱ्यात हत्तींकडून पिकांचे नुकसान

Elephant Crop Damage : तालुक्यात हत्तींचा उपद्रव काही कमी झालेला नाही. काही दिवसांपासून तो अधिक वाढला आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी हत्तींच्या तडाख्यात सापडला आहे.

Team Agrowon

Kolhapur News : तालुक्यात हत्तींचा उपद्रव काही कमी झालेला नाही. काही दिवसांपासून तो अधिक वाढला आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी हत्तींच्या तडाख्यात सापडला आहे. थोड्या फार पावसाने पोटरीला आलेली पिके आता हत्तींच्या तडाख्यातून वाचवायची कशी, या चिंतेत तो आहे.

तालुक्यात गेल्या दहा वर्षांपासून दोन टस्कर वावरत आहेत. हे टस्कर तालुक्याच्या पश्चिम भागात तळ ठोकून आहेत. एक टस्कर सध्या खानापूर व देऊळवाडी परिसरात असून, दुसरा घाटकरवाडी, धनगरमोळा परिसरात आहे. खानापूर परिसरातील टस्कराला चाळोबा गणेश असे नामकरण केले असून, धनगरमोळा परिसरात वावरणाऱ्या टस्कराला अण्णा असे म्हटले जाते.

या टस्करांकडून हाता तोंडाशी आलेली पिके फस्त होत आहेत. यंदाचा पावसाळा खरीप हंगामासाठी चांगला गेला नाही. पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे. वर्षाची बेगमी शेतकऱ्यांना मिळणार नाही. अशी परिस्थिती असताना आता टस्कर हत्तींनी उचल खाल्ली.

ते शेतात पोटरीशी आलेली भाताची पिके, नागली फस्त करीत आहेत. त्याच्या उपद्रवाने शेतकरी हैराण आहेत. यंदा जे काही पदरात पडणार होते तेही मिळणे मुश्कील होणार आहे. थोडेफार उत्पादन मिळणार होते तो वाटाही हत्ती पळवण्याची भीती पश्चिम भागातील शेतकऱ्यांना असून पिके कशी वाचवायची या चिंतेत शेतकरी आहेत.

तालुक्यात दोन टस्कर वावरत असल्याने वन विभागाची त्रेधातिरपीट उडत आहे. एका गावात टस्कर पिकात उतरला असा भ्रमणध्वनी आला की दुसऱ्या गावत दुसरा टस्कर पिकाचे नुकसान करीत असल्याचा फोन येतो. वन विभागाचे टस्करला रोखण्यासाठी एकच पथक असल्याने त्यांची त्रधातिरपीट होत आहे.

आजऱ्यात हत्ती संगोपन केंद्र तयार व्हावे. जंगलात वावरणाऱ्या हत्तींना या संगोपन केंद्रात पाठवून त्यांना पाळीव करणे. हत्ती सफारीसाठी वापर करणे यासाठी शासनाच्या पातळीवर हालचाली सुरू आहेत.

घाटकरवाडी येथे याची जागा निश्चित करण्यात आली. पण याला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला. ग्रामस्थांचा गैरसमज दूर व्हावा यासाठी शिमोगा (कर्नाटक) येथे ग्रामस्थांना पाठविण्यात आले होते. अद्याप याबाबत हालचाल नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT