Banana Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Damage : खानदेशात पावसाने केळीसह अन्य पिकांची मोठी हानी

Heavy Rain Crop Loss : खानदेशात मागील पंधरवड्यात विविध भागात वादळी पाऊस झाला असून, यात केळीसह अन्य पिकांची मोठी हानी झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील पंधरवड्यात विविध भागात वादळी पाऊस झाला असून, यात केळीसह अन्य पिकांची मोठी हानी झाली आहे. महसूल प्रशासन पंचनामे केले असून, जळगाव जिल्ह्यात सुमारे एक हजार हेक्टरवरील बागांना फटका बसला आहे.

मागील पंधरवड्यातही खानदेशात वादळी पाऊस झाला आहे. यात केळीची मोठी हानी चोपडा, रावेर जळगाव, मुक्ताईनगर आदी तालुक्यात झाली असून, सुमारे १००० हेक्टरला मोठा फटका बसला आहे.

जामनेरात १००, रावेरात ६००, यावलमध्ये २०० आणि जळगाव तालुक्यातही सुमारे १०० हेक्टरवरील केळी भुईसपाट झाली आहे. सुमारे दोन हजारपेक्षा अधिक केळी उत्पादकांचे यात नुकसान झाले आहे. रावेरातील मध्य व उत्तर भागाला फटका बसला.

दुसरीकडे पाऊसही सतत होता. यामुळे कोसळलेल्या झाडांची काढणी अनेक शेतकरी करू शकले नाहीत. या स्थितीत महसूल प्रशासनाने पंचनामे केले आहेत. प भरपाईसंबंधी पुढील कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.

वादळी पाऊस झाला पण महसूल प्रशासन, कृषी सहायक अनेक भागात पोचलेलेच नसल्याच्या तक्रारीदेखील आहे. महसूल प्रशासन नुकसानीची टक्केवारी कमी आहे, आम्हाला आदेश नाहीत, असे सांगून ढकलाढकली करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, प्रशासनातील वरिष्ठांनी दखल घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. सध्या निवडणुकीचा काळ सुरू आहे. सर्वच लोकप्रतिनिधी आपापली कामे उरकून घेत आहेत. मतदारसंघात व्यस्त आहेत. अशात शेतकरी दुर्लक्षित आहेत.

विमा योजनेतून नाही मिळणार भरपाई

फळ पीकविमा योजनेतून केळीला नोव्हेंबर ते जुलै या नऊ महिन्यांसाठीच विमा संरक्षण दिले जाते. परंतु खानदेशात केळीची हानी सप्टेंबर अखेरीस व ऑक्टोबरमध्येही झाली आहे. या कालावधीत नुकसानीबाबत विमा कंपनीकडून कुठलीही दखल घेण्यात आली नाही. कारण या कालावधीत केळीस विमा संरक्षण नव्हते. यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाईची अपेक्षा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT