Crisis Jowar Crop agrowon
ॲग्रो विशेष

Crisis Jowar Crop : कोल्हापुरात शाळू पिकावर संकट; पक्षांच्या उपद्रवामुळे कणसे होत आहेत फस्त

Kolhapur Farmers : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात सर्वाधिक शाळू पिकाचे उत्पादन घेतले जाते. तालुक्यातील अनेक भागात अल्पभुधारक शेतकऱ्यांनी शाळू पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले.

sandeep Shirguppe

Jowar Crop Damage : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात सर्वाधिक शाळू पिकाचे उत्पादन घेतले जाते. तालुक्यातील अनेक भागात अल्पभुधारक शेतकऱ्यांनी शाळू पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले. परंतु पिकावर पाखरांचा उपद्रव वाढल्याने शाळूची कणसे पाखरे फस्त करत आहेत. तर काही ठिकाणी शाळूची वाढ झाली नसल्याने चाऱ्यासाठी गुंठ्यावर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

शाळू उत्पादक शेतकरी अवधूत खामकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "खरिपानंतर रबीच्या पेरणीत शाळू पिकाची लागवड कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आली. मालदांडी जातीच्या शाळवाची अधिक प्रमाणात पेरणी केली होती. थंडीत हुरडा झाल्यानंतर धान्य भरत असताना पाखरांच्या उपद्रवामुळे धान्यविना कणसे रिकामी होण्याची वेळ आली आहे".

"शिरोळ तालुक्यात अनेक गावात अशीच परिस्थिती आहे. शाळवाची कणसे पक्व होण्याच्या अवस्थेत असताना पाखरांच्या उपद्रवामुळे कणसे रिकामी झाली आहेत. धान्य आणि जनावरांना पावसाळ्यात सुका चारा म्हणून कडबा मिळावा यासाठी केलेले पीक शाळू चाऱ्यासाठी विकावे लागत आहे". असे खामकर म्हणाले.

शिरोळ तालुक्यातील बहुतेक शेतकरी विक्रीऐवजी वर्षभराची बेजमी म्हणून अर्धा एकर, एकर, दोन एकर या प्रमाणात शाळूची लागवड करतात. कामगारांची उणिवा, खतांचे दर, बी-बियाणे, पाणीपट्टी याबरोबरच देखरेखीचा खर्च वाढला आहे. ज्वारीचे वाढलेले दर लक्षात घेता वर्षभराच्या धान्याची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांकडून ज्वारीची लागवड केली जाते. महिन्यात ज्वारी कापणी आणि खुडणीला येत असते. मात्र, पाखरांच्या उपद्रवामुळे पीक हातचे गेल्याची स्थिती आहे.

बाराशे ते चौदाशे रुपयांनी गुंठ्यावर विक्री

शाळू पिकांची वाढ खुंटली आहे तर काही ठिकाणी पक्षांनी पिकाचे नुकसान केल्याने शेतकरी प्रतिगुंठा बाराशे ते चौदाशे रुपये दराने विक्री करत आहे. चाऱ्यासाठी पीक कापणी केल्यानंतर उसाच्या खोडव्याप्रमाणे शाळवाचेही दुसऱ्यांदा उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मात्र, दुसरे पीकदेखील चाऱ्यासाठीच विकून झालेले नुकसान शेतकऱ्यांना भरून काढावे लागणार आहे.

पावसाळ्यात कडब्याचीही टंचाई

ज्वारी पीक चांगल्या प्रकारे पिकवून वर्षभराच्या धान्याची बेजमी करण्याबरोबरच पावसाळ्यात जनावरांना सुका चारा म्हणून कडब्याची व्यवस्था होते. मात्र, पाखरांच्या उपद्रवामुळे पीक चाऱ्यासाठी विकावे लागत असल्याने पावसाळ्यात कडबादेखील आता मिळणे कठीण होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT