Dr. Kiran Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Food Processing : ‘राजमाता’ नावाने ‘एक जिल्हा एक ब्रँड’ तयार करा

Latest Agriculture News : ‘एक जिल्हा एक ब्रँड’ उभारत सर्व गट कंपन्यांनी प्रक्रिया करीत ‘राजमाता’ नावाने जिल्ह्याचा ब्रँड तयार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

Team Agrowon

Buldana News : आपापल्या क्षमता ओळखून एक नवीन ठसा कृषी क्षेत्रात उमटावा. सामूहिक पद्धतीने शेतकऱ्यांनी प्रगती करावी. महिला बचत गटांनी लोणचे/पापड उद्योगापलीकडे आपल्या क्षमता ओळखत प्रगती करावी. ‘एक जिल्हा एक ब्रँड’ उभारत सर्व गट कंपन्यांनी प्रक्रिया करीत ‘राजमाता’ नावाने जिल्ह्याचा ब्रँड तयार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) पुढाकाराने येथे शेतकरी उत्पादक कंपनी व गटांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्‌घाटक म्हणून डॉ. पाटील बोलत होते.

या वेळी विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, आत्मा प्रकल्प संचालक पी. व्ही. उन्हाळे यांची प्रमुख उपस्‍थिती होती.

कार्यक्रमाला मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त सुरेंद्र गावडे, एन. एस. अंभोरे, दादाराव हटकर, प्रवीण वानखेडे यांनी पहिल्या सत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दिलीप राठोड यांनी ड्रोनद्वारे फवारणी आधुनिक शेती व कृषी माल खरेदी विक्री याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

महाऊर्जाचे जिल्हा व्यवस्थापक विजय काळे यांनी दुपारच्या सत्रांत महाकृषी ऊर्जा अभियान, पंतप्रधान शेतकरी कुसुम योजनेविषयी माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. ढगे यांनी, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सामूहिक शेतीकडे वळावे व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन प्रक्रिया उद्योग उभारण्याचे आवाहन केले.

श्री. मुळे यांनी शेतकरी गट/कंपन्या ते ग्राहक ही साखळी तयार व्हावी. कृषी क्षेत्रामध्ये प्रगती घडावी असे सांगितले. कृषी निर्यातीबाबत प्रवीण वानखेडे यांनी सविस्तर माहिती दिली. अग्रणी बँकेचे मयूर लोणकर यांनी कृषी पायाभूत योजनांसंदर्भात मार्गदर्शन केले. नाबार्डचे रोहित गाडे यांनी नाबार्डच्या योजना मांडल्या. पी. व्ही. उन्हाळे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT