Pune News : देशी गाईच्या शुद्ध दुधापासून सॉफ्टी आइस्क्रीम बनविण्याचा व विक्री करण्याचा प्रकल्प पुणे कृषी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर चालू केला आहे. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पामध्ये सॉफ्टी आइस्क्रीम बनविण्याचे व विक्रीचे काम कृषी महाविद्यालयामध्ये कृषी पदवीच्या चतुर्थ वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी करीत आहेत.
पुणे कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागांतर्गतच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात देशी गायींच्या दुधापासून सॉफ्टी आइस्क्रीम बनविण्याच्या मशिनचे उद्घाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते बुधवारी (ता.४) झाले.
या प्रसंगी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने, तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे, डॉ. रवींद्र बनसोड, डॉ. संतोष मोरे, डॉ. ताई देवकाते, डॉ. मृणाल अजोतीकर, डॉ. जोतिबा कुंभार, भारतीय देशी दुधाळ गोवंश साहिवाल क्लबचे उपाध्यक्ष रवींद्र लाड उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, ‘‘सध्या दुग्ध व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. दुधाचे दर खूप कमी जास्त होत आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना तोटा सहन करायला लागत आहे. दुग्धोत्पादक शेतकरी स्थानिक पातळीवर उच्च दर्जाचे दुग्धजन्य पदार्थ तयार करून ग्राहकांचा विश्वास संपादन करून दुग्ध व्यवसायात यशस्वी होऊ शकतात.
सध्या भेसळीमुळे अनेक लोक दूध व दुग्धजन्य पदार्थ खाण्यास घाबरत आहेत. यात प्रामुख्याने पनीर, खवा या दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठी भेसळ सणासुदीच्या काळामध्ये दिसून येते. त्याचप्रमाणे आइस्क्रीम हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. यामध्ये सुद्धा दुधाऐवजी इतर वेगवेगळे तेल वापरून आइस्क्रीम बनवले जाते. त्यामुळे देशी गायीच्या दुधापासून बनविलेले ताजे स्वच्छ आइस्क्रीम विकण्याचे काम कमालीचे आनंददायी आहे.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.