Illegal Money Lending  Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Money Lending : अवैध सावकारीवर कारवाईचा धडाका

Maharashtra financial crime : अवैध सावकारी करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक यांनी सातत्याने कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे.

Team Agrowon

Amaravati News : अवैध सावकारी करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक यांनी सातत्याने कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. त्या अंतर्गत चांदूर बाजार येथील एका सावकाराच्या निवासस्थानासह त्याच्या व्यावसायिक प्रतिष्ठानावर धाड घालून आक्षेपार्ह दस्तवेज जप्त करण्यात आले.

इश्वरदास एकनाथराव ठाकरे असे अवैधरित्या सावकारी करणाऱ्या सावकाराचे नाव असून त्याच्याविरोधात प्राप्त तक्रारींवरून जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी दोन पथकांची नियुक्ती करून कारवाई केली. पहिली कारवाई सहायक निबंधक राजेश भुयार यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

या पथकाने ईश्वरदास ठाकरे याच्या आठवडी बाजार सराफा लाईन येथील किराणा दुकानात धाड घातून दोन स्वाक्षरी असलेले कोरे धनादेश जप्त केले. या धाड कारवाईत सुधीर मानकर, स्वीटी गवई, नंदकिशोर दहीकर, पोलिस कर्मचारी शाकीर हारून शेख व श्रीमती निलीमा इंगळे यांच्यासह पंच म्हणून ओमप्रकाश बोराळकर व कुलदीप कांडलकर सहभागी झाले होते.

दुसरी धाड ईश्वरदास ठाकरे याच्या काकडेपुरा येथील निवासस्थानी सहायक निबंधक स्वरूपा जुमळे यांच्या नेतृत्वातील पथकाने घातली. तपासणीत त्याच्या घरातून आक्षेपार्ह दस्तवेज आढळले नाहीत.

या कारवाईत अविनाश महल्ले, किशोर भुस्कडे, प्रमोद वर्धेकर, पोलिस कर्मचारी मिलिंद वाटाणे, शालिनी वऱ्हाडे यांच्यासह पंच म्हणून भूषण बोराळे व नकुल काळे यांनी सहभाग घेतला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT