Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fake Fertilizer Sale : बनावट खत विक्रीबद्दल वर्षभरात २४ परवाने निलंबित

Bogus Fertilizer : गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करत तारदाळ (ता. हातकणंगले) व करवीर तालुक्यातील एका विक्रेत्याची खत विक्री व निर्मिती करणाऱ्या दोन विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यात यंदा हंगामात कृषी विभागाने बनावट कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर वर्षभरात धडक कारवाई केली आहे. दोन खतांचे आणि दोन कीटकनाशके विक्रीचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले असून, १८ खतांचे आणि २ कीटकनाशके विक्रीचे असे २४ परवाने निलंबित केले आहेत.

बनावट प्रकाराला आळा घालण्यासाठी तालुकास्तरीय १२, जिल्हास्तरीय एक अशा १३ भरारी पथकांद्वारे विक्रेत्यांवर नजर ठेवली जात असून, कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी नियमभंग केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करत तारदाळ (ता. हातकणंगले) व करवीर तालुक्यातील एका विक्रेत्याची खत विक्री व निर्मिती करणाऱ्या दोन विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत ४ लाख ४१ हजारांची मालमत्ता जप्त केली आहे.

आगामी खरीप हंगामात कोणत्याही प्रकारे खताचे लिंकिंग न करता शेतकऱ्यांना खतांचा नियमित पुरवठा केला जावा, अशी स्पष्ट सूचना कृषी विभागाने दिली आहे. यावर्षी जिल्ह्यासाठी एकूण १ लाख ५६ हजार ६७७ टन खत मंजूर झाले आहे, त्याचा पुरवठा नियमित सुरू आहे.

जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी विक्रीसाठीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, नियमभंग केल्यास कठोर कारवाईचा इशारा जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगारे व कृषी विकास अधिकारी सारिका रेपे यांनी दिला.

शेतकऱ्यांचे अर्थकारण शेतीमालावर अवलंबून आहे. योग्य निविष्ठा असेल, तर उत्पादन वाढेल. सर्व विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना निविष्ठा देताना गुणवत्तेशी तडजोड न करता मापक दरात निविष्ठा द्याव्यात.
- एन. एस. परीट, कृषी उपसंचालक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT