Fake Fertilizer : बनावट खतविक्री प्रकरणी हिमायतनगरमध्ये गुन्हा

Bogus Fertilizer : हिमायतनगर तालुक्यात सेंद्रिय खताच्या नावाखाली बनावट खते विनापरवाना विकत असल्याची माहिती पोलिसांना लागताच त्यांनी मालवाहू ठाण्यात लावली.
Fertilizer
FertilizerAgrowon
Published on
Updated on

Nanded News : हिमायतनगर तालुक्यात सेंद्रिय खताच्या नावाखाली बनावट खते विनापरवाना विकत असल्याची माहिती पोलिसांना लागताच त्यांनी मालवाहू ठाण्यात लावली. यानंतर कृषी विभागाने कार्यवाही करत हिमायतनगर पोलिस ठाण्यात खत नियंत्रण आदेशानुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हिमायतनगरमधील सरदार मीलजवळ असलेल्या गोडाऊनमध्ये सेंद्रिय खत ध्रुव (७५० बॅगा), हायशक्ती बेनीफीड (२२० बॅगा), ह्युमिक ॲसीड (१२८ बॉटल), गोल्डन ४ जी (७५ बॉटल) असा साठा करून तो तालुक्यात विक्री केला जात होता.

Fertilizer
Fake Fertilizer Stock : कृषी विभागाच्या धाडीत बनावट खतसाठा जप्त

या प्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी कार्यवाही करत मालवाहू वाहनातील तसेच गोडावूनमध्ये साठा केलेल्या साडेसात लाखांच्या खतासह पाच लाख रुपयाचे वाहन असे एकूण १२ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (ता. २२) रात्री उशिरा करण्यात आली. पोलिसांनी पिकअपसह खताच्या बॅग जप्त केल्या आहेत.

Fertilizer
Fake Fertilizer : कोल्हापुरात बनावट खत साठा जप्त

या प्रकरणी तेलंगणातील करुपली मारया व्यंकन्ना, प्रवीण व्यंकया अडेप्पू, मलेश सत्यनारायण बोडला (सर्व राहणार तेलंगणा) व ख्वाजा नसीर ख्वाजा वजीर (रा. हिमायतनगर) यांच्याविरुद्ध कृषी अधिकारी गंगाधर भदेवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी १२ लाख ५९ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.

‘पक्के बिल घेऊनच खरेदी करावी’

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्‍यांनी विनापरवाना खते किंवा बियाणे खरेदी करू नये, परवानाधारक वितरक किंवा दुकानदार यांच्याकडूनच पक्के बिल घेऊनच खते व बियाणे खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com