Cowpea Fodder Agrowon
ॲग्रो विशेष

Cowpea Fodder : चवळी : पौष्टिक, जलद वाढणारा जनावरांसाठी सकस हिरवा चारा

Fodder Scarcity : उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते. जनावरांच्या योग्य पोषणासाठी हिरव्या चाऱ्याची मोठी गरज असते. उन्हाळ्यात गवत आणि चाऱ्याची नैसर्गिक वाढ मर्यादित असल्यामुळे, योग्य नियोजन आवश्यक असते.

Team Agrowon

डॉ. राहूल काळदाते

उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते. जनावरांच्या योग्य पोषणासाठी हिरव्या चाऱ्याची मोठी गरज असते. उन्हाळ्यात गवत आणि चाऱ्याची नैसर्गिक वाढ मर्यादित असल्यामुळे, योग्य नियोजन आवश्यक असते. चवळी हे शेंगायुक्त लवकर वाढणारे, पौष्टिक आणि चवदार चारा पीक आहे. हे एक उत्कृष्ट आच्छादन पीक आहे, तसेच जमीन सुपीकतेसाठी फायदेशीर आहे.

हे पीक ज्वारी, बाजरी, मका या चारा पिकाच्या सोबत लावले जाते. हा चारा जनावरे आवडीने खातात. चवळीचा चारा हा पौष्टिक मूल्यांनी खूप समृद्ध आहे. यामध्ये कोरड्या पदार्थाच्या आधारावर सरासरी २०-२४ टक्के क्रूड प्रोटीन, ४३-४९ टक्के तंतूमय घटक, २३ ते २५ टक्के सेल्यूलोज आणि ५ ते ६ टक्के हेमिसेल्युलोज असते. या चाऱ्याची पचन क्षमता ७० टक्यांपेक्षा जास्त आहे.

पिकाच्या चांगल्या वाढीसाठी हलकी, मध्यम जमीन उत्तम मानली जाते. लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन आवश्यक असते. लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट आणि कुळवणी करावी.

मार्च महिन्याच्या मध्यावर या पिकाची पेरणी करावी. २ ते ३ सेंमी खोलीवर पेरणी करावी. ओळीतील अंतर २५ ते ३० सेंमी असावे. प्रति हेक्टरी ३० ते ४० किलो बियाणे वापरावे.

पिकामध्ये वातावरणातील नायट्रोजन जमिनीमध्ये स्थिरीकरण करण्याची क्षमता असल्याने नत्र युक्त खताची कमी गरज लागते. चांगल्या वाढीसाठी पेरणीच्या वेळी २० किलो नत्र, ६० किलो पोटॅश प्रती हेक्टर द्यावे.

उन्हाळ्यात पिकाला दर ८ ते १० दिवसांच्या अंतराने ६ ते ७ पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. सुरुवातीच्या काळात तणांचा प्रादुर्भाव जास्त असतो. परंतु ३० दिवसांनंतर हे पीक संपूर्ण जमीन झाकते. सुरुवातीच्या काळात तण नियंत्रणासाठी एक खुरपणी आवश्यक असते.

हिरव्या चाऱ्यासाठी चवळीची काढणी पीक ५०टक्के फुले आल्यापासून ते ५० टक्के शेंगा तयार होईपर्यंत पूर्ण करावी, अन्यथा त्यानंतर त्याचे खोड कठीण आणि जाड होते आणि चाऱ्याचे पौष्टिक मूल्य आणि चवीवर परिणाम होतो. सुधारित जातींची लागवड केली तर सरासरी २५ ते ४० टन प्रती हेक्टरी हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.

सुधारित जाती

जात हिरवा चारा

(टन/हेक्टर)

श्वेता ३०-३५

युपीसी-५२८७ ३५-४०

युपीसी-५२८६, आईएफसी-८४०१ ३५-४०

युपीसी-४२०० ३५-४५

जीएफसी-१,२,३ २५-३५

आईएफसी-८४०१,

इसी-४२१६ ३०-४०

- डॉ. राहूल काळदाते,

९८६०९०७०४१

(संशोधन सहयोगी, राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विश्वविद्यालय,झासी, उत्तर प्रदेश)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crop Import : जीएम अन्नपदार्थांना लगाम घाला; गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या, भारतीय किसान संघाची मागणी

Mosambi Pest Control : नवीन किडीविषयी संशोधन करून त्यावर उपाययोजना करणार

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT