Holi Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Holi Festival : यंदा गोवऱ्यांची होळी पेटणार

Team Agrowon

Panveal News : पनवेल परिसरात होळी सण (Holi Festival) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीमध्ये जाळण्यासाठी लाकडाबरोबरच आता गोवऱ्यांना (Cow Dung) मोठ्या प्रमाणात मागणी आहे, अशी माहिती करंजाडे येथील तबेल्याचे मालक भरवाड कुटुंबीयांनी दिली.

त्यामुळे पनवेल परिसरात पर्यावरणपूरक यंदाची होळी पेटणार आहे. यानिमित्त 'झाडे वाचवा-पर्यावरण वाचवा' हा उद्देशही सफल होताना दिसत आहे.

कोरोनंतर यावर्षी सगळीकडे होळी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. होळीसाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडून पर्यावरणाची हानी केली जात असते. पण, आता झाडेच कमी झाल्याने होळीला लाकडे मिळत नाहीत.

लाकडांना पर्याय म्हणून गोवऱ्यांचा वापर केला जात आहे. इतर वेळी २ रुपयांना विकल्या जाणाऱ्या गोवऱ्या बाजारात तीन ते पाच रुपयांना मिळत आहे.

पनवेलच्या करंजाडे परिसरात असलेल्या तबेल्याचे मालक भरवाड कुटुंबीयांचा शेणी विकण्याचा व्यवसाय आहे. भावनागरहून ४२ वर्षांपूर्वी हे कुटुंब पनवेलमध्ये आले. या कुटुंबात झीलू लाखा भरवाड सर्वांत ज्येष्ठ महिला आणि त्यांची सून मिना भुपा भरवाड या शेणी बनवतात.

दिवसाला हजार शेणी त्या बनवतात. पूर्वी म्हशी जास्त असल्याने रोज २६-२७ घमेली शेण असायचे. त्या वेळी त्यांची नात सून खोपा भरवाड व इतर कुटुंबीय त्यांना मदत करत असे.

होळी स्टिकचाही वापर

होळीसाठी गोवऱ्यांचा वापर सुरू होणे हे चांगलेच आहे. याशिवाय गाईच्या शेणापासून मशिनवर बनवलेली होळी स्टिकचाही सध्या वापर केला जातो. दोन फुटांची स्टिक ७०० ग्रॅम ते १ किलोच्या आसपास असते. १ स्टिक १० ते १५ रुपये दराने मिळते.

एका सोसायटीला ७५ ते १०० अशा स्टिक पुरेशा होतात. एक गाव एक होळी किंवा एक आळी एक होळी अशी संकल्पना आता राबवायला हवी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT