Electricity Rate : दरवाढीच्या विरोधासाठी वीजबिलांची होळी करणार

विजेच्या संभाव्य दरवाढीमुळे ग्राहक, शेतकऱ्यांसह उद्योगधंद्यांचे कंबरडे मोडणार आहे.
Electricity
ElectricityAgrowon
Published on
Updated on

Agriculture Electricity News नाशिक : विजेच्या संभाव्य दरवाढीमुळे (Electricity Rate) ग्राहक, शेतकऱ्यांसह उद्योगधंद्यांचे कंबरडे मोडणार आहे. या अन्याय दरवाढीविरोधात सर्वच संघटना व ग्राहकांनी २८ फेब्रुवारीला वीजबिल (Electricity Bill) होळी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे (Pratap Hogade) यांनी केले.

जिल्हा ग्राहक पंचायत, वीज ग्राहक समितीतर्फे रविवारी (ता. १२) कुसुमाग्रज स्मारक येथे ग्राहक जागृती सभा झाली. ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष विलास देवळे अध्यक्षस्थानी होते. सभेत प्रमुख वक्ते म्हणून होगाडे यांनी या दरवाढीने राज्यातील उद्योगधंदे टिकाव धरू शकणार नाहीत. तसेच सामान्य ग्राहक, शेतकऱ्यांचेही कंबरडे मोडणार असल्याचे सांगितले.

Electricity
Agriculture Electricity : वीजबिल वसुलीसाठी तोडल्या ७९०० जोडण्या

‘महावितरण’ची रेकॉर्ड ब्रेक सरासरी २.५५ रु. प्रति युनिट म्हणजे ३७ टक्के दरवाढीच्या मागणीविरोधात ग्राहक व संघटनांनी हरकती दाखल करणे आवश्यक आहे. दरवाढीच्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी ड्यूटी रकमेचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडणार तो वेगळाच आहे.

इतकी प्रचंड मागणी आयोग स्थापन झाल्यापासून गेल्या २३ वर्षांत प्रथमच करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक दर असूनही इतकी प्रचंड मागणी राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांना शॉक देणारी तसेच येऊ घातलेल्या उद्योगांना रोखणारी व असलेल्या उद्योगांना राज्याबाहेर ढकलणारी आहे.

Electricity
Agriculture Electricity : शेतीसाठी दिवसा वीज न दिल्यास आंदोलन करणार

‘महावितरण’च्या या भरमसाट दरवाढ मागणीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व वीज ग्राहक व विविध औद्योगिक, शेतकरी, रहिवासी व ग्राहक संघटनांनी विरोध करावा आणि प्रचंड प्रमाणात हरकती नोंद कराव्यात, असे जाहीर आवाहन होगाडे यांनी केले आहे. राज्यातील ही वीज दरवाढ देशात सर्वाधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्या ग्राहकांना अधिकाधिक त्रास देण्याचे धोरण असल्याचे महाराष्ट्र चेंबरच्या एनर्जी कमिटीचे सदस्य मुकुंद माळी यांनी सांगितले. जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष विलास देवळे यांनी प्रास्ताविकात ‘महावितरण’ कंपनीने अंतर्गत तक्रार निवारण केंद्राबरोबरच दर सोमवारी होणारी ग्राहक सुनावणी बंद केल्यामुळे सर्वांमध्येच नैराश्य आल्याचे सांगितले.

कंपनी उच्च, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडेही दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. या भ्रष्ट कारभारामुळे येथील उद्योगधंदेही अन्य राज्यात स्थलांतरित होण्याची भीती श्री. देवळे यांनी व्यक्त केली. या वेळी मंगेश पिंगळे, अॅड. मुकुंद बूब, अॅड. कल्याणी गायकवाड, धनंजय गायकवाड, गौरी पुराणिक आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com