Mulberry Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Mulberry Farming : तुती बागेमध्ये आच्छादन महत्त्वाचे...

Mulberry Mulching : नवीन तुती लागवड केलेल्या शेतात तूट होऊ नये म्हणून रोपवाटिका तयार करावी. पट्टा पद्धतीने रोपांची लागवड करावी. पट्टा पद्धतीमध्ये जमिनीतील पाण्याचा ओलावा टिकवणे आणि तुती पानांच्या उत्पादनवाढीसाठी आच्छादन करणे गरजेचे आहे.

Team Agrowon

Mulberry Mulching Techniques :

डॉ. सी. बी. लटपटे, डॉ. संजोग बोकन, डी. एन. मोहोड

तुती लागवडीपूर्वी माती परीक्षण महत्त्वाचे आहे. रेशीम कीटकांचे तुती पाने हे एकमेव खाद्य आहे. तुती लागवड पट्टा पद्धतीने केल्यास ६ बाय ३ बाय २ फूट किंवा ५ बाय ३ बाय २ फूट अंतरावर अनुक्रमे झाडांची हेक्टरी संख्या १२,३४५ आणि १३,८८८ एवढी बसते. नवीन तुती लागवड केलेल्या शेतात तूट होऊ नये म्हणून तुती रोपवाटिका तयार करावी.

तीन महिन्यांनी शेतात पट्टा पद्धतीने लागवड करावी. तुती लागवडीसाठी चिबड किंवा चोपण जमीन टाळावी. पाण्याचा योग्य निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. दरवर्षी एकरी तुती पानांचे २५ टन उत्पादन मिळण्यासाठी तुतीच्या व्ही-१ जातीची निवड करावी. लागवडीपूर्वी बेण्यास कार्बेन्डाझिमची प्रक्रिया करावी.

गादी वाफ्यावर पेन्सील आकाराचे तीन डोळ्याचे बेणे, एक डोळा जमिनीवर राहील या प्रमाणे लागवड करावी आणि लगेच पाणी द्यावे. दोन ओळीत १५ सेंमी आणि दोन बेण्यात १० सेंमी अंतर ठेवावे. गादीवाफ्यास ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. मार्च महिन्यांपर्यंत रोपवाटिका तयार करता येते.

उन्हाळ्यात सावलीसाठी शेडनेटचा वापर करावा. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील हवामान उष्ण व कोरडे राहते. हिवाळा आणि उन्हाळ्यात संगोपनगृहात रात्री व दिवसा कमालीचे बदल जाणवतात. म्हणून कच्या शेडनेटगृहाऐवजी पक्के कीटक संगोपनगृह बांधावे.

तुतीबागेत आच्छादन :

जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्याबरोबर पीक उत्पादनात वाढ होण्यासाठी आच्छादन फायदेशीर ठरते. पालापाचोळा, सेंद्रिय पदार्थ, लाकडी भुसा, समुद्र शेवाळ आणि काळे पॉलिथिन शीट यांचा वापर आच्छादनासाठी करावा. तुती बागेतून हेक्टरी १५ ते १८ टन तुती पाने संगोपनानंतरही शिल्लक राहतात.

आच्छादनामुळे जमिनीत ओलावा टिकवून राहतो. मुळांच्या भागातील जमिनीचे तापमान कमी राहिल्यामुळे झाडांच्या वाढीस बळकटी मिळते. पानांच्या उत्पादनात वाढ होते.

पाणी दिलेल्या तुती बागेतील पानांमध्ये जास्त आद्रता व प्रथिनांचे प्रमाण असते. कोरडवाहू बागेपेक्षा पानांत जास्त अन्न घटकांची उपलब्धता असते.

पट्टा पद्धतीमध्ये जमिनीतील पाण्याचा ओलावा टिकवून ठेवणे आणि तुती पाने उत्पादनवाढीसाठी आच्छादन करणे गरजेचे आहे. हिरवळीचे खत, गवत काडी कचरा, लाकडाचा भुसा, काड्यांचा चुरा, काळे पॉलिथिन आच्छादन करावे. यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून राहतो, तणांची वाढ होत नाही.

तुती बागेत काळ्या रंगाचे लो डेन्सिटी पॉलिइथिलिन शीट (२०० गेज जाड) आच्छादन म्हणून वापरावे.

एक एकर तुती बागेत साधारणत: २०० किलो पॉलिथिन शीट आच्छादनासाठी लागते.

प्रत्येक ६० ते ७० दिवसांच्या दरम्यान तुती छाटणीच्या वेळी आणि खत दिल्यानंतर, तुती लागवडीमध्ये तण असेल तरी वरून आच्छादन टाकून त्यावर थोडी माती टाकावी.

तुती लागवडीत ५ बाय ३ बाय २ किंवा ६ बाय ३ बाय २ फूट अंतरावरील पट्टा पद्धतीमध्ये काळे पॉलिथिन आच्छादन कायम ठेवले तरी चालते. दोन पट्ट्यांतील अंतर ५ किंवा ४ फुटांपेक्षा कमी म्हणजे ३ फूट असेल तर तुती छाटणी व आंतरमशागतीच्या वेळी पॉलिथिन आच्छादन काढून घ्यावे. पाण्याच्या पाळ्या देण्यापूर्वी पट्यात पुन्हा आच्छादन पसरवून द्यावे.

काळे पॉलिथिन आच्छादन आणि ठिबक सिंचन दोन्ही पद्धती एक वेळा ३ फूट पट्ट्यांत वापरता येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होते. तुतीची वाढ झपाट्याने होते. आच्छादनामुळे तण निंदणीचा खर्च वाचतो.

बागायती /कोरडवाहू तुती लागवडीत उन्हाळ्यात काळ्या पॉलिथिन आच्छादनाचा वापर केल्यास तुती पानाची उत्पादकता वाढते. कोषाची पिके घेणे शक्य होते.

रोपवाटिकेत काळे पॉलिथिन आच्छादन फायदेशीर ठरते. रोपांची जोमदार वाढ होते.

आच्छादनाचा फायदा :

काळे पॉलिथिन आच्छादनासाठी एकरी ८,००० रुपये लागतात. पॉलिथिनच्या जाडीनुसार दर असतो. एकदा खरेदी (२०० गेज) केलेले पॉलिथिन शीट व्यवस्थित वापर केल्यास तीन वर्षे टिकते.

वर्षाकाठी पाच पिके करण्यासाठी मजुरांच्या साह्याने एक एकर तण नियंत्रणासाठी १२५ मनुष्य दिवस लागतात. त्यासाठी सरासरी १२,५०० रुपये खर्च लागतो. त्याच्या तुलनेत काळ्या पॉलिथिन आच्छादनासाठी, १० मनुष्य दिवस / एकर / वर्ष लागतात. प्रति पीक एकरी २ मनुष्य दिवस आच्छादनविरहित क्षेत्रातील तुती बुंध्याजवळील गवत काढणीसाठी लागतात.(१००० रुपये प्रति पीक)

काळे पॉलिथिन आच्छादन असलेल्या बागेतून २,७२५ किलो पानांचे जास्त उत्पादन आच्छादन केलेल्या बागेपेक्षा मिळते त्याची किंमत ८,९५० रुपये होते.

काळे पॉलिथिन आच्छादन केलेल्या रोपवाटिकेत १६ टक्के जास्त रोपांची वाढ आच्छादन न केल्याच्या तुलनेत अढळून आली. त्यामुळे १८,५५५ जास्तीची प्रति एकरी रोपे मिळतात. आच्छादनामुळे ७,५०० रुपये एवढी तण निंदणी खर्चात बचत झाली. एकरी २६,०८८ रुपये एवढा फायदा झाला.

संपर्क : डॉ. सी. बी. लटपटे, ७५८८६१२६२२

(प्रभारी अधिकारी, रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT