Subsidy For Grape Farming : द्राक्ष पिकाच्या प्लॅस्टिक आच्छादनासाठी ६ कोटी मंजूर

Grape Crop Protection : नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष शेतीचे गेल्या काही वर्षांत अतोनात नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी द्राक्ष पिकावर प्लॅस्टिक आच्छादन हा एक पर्याय होता.
Grape
GrapeAgrowon

Nashik News : नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष शेतीचे गेल्या काही वर्षांत अतोनात नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी द्राक्ष पिकावर प्लॅस्टिक आच्छादन हा एक पर्याय होता. यासाठी शासनाकडून अनुदान दिले जावे अशी शेतकऱ्यांची व महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची सातत्याने मागणी होती.

अखेर आता द्राक्ष उत्पादकांची प्रतीक्षा आता संपली असून, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत द्राक्षांसाठी प्लॅस्टिक आच्छादनाला राज्य सरकारने ६ कोटी १४ लाख निधी वाटपास मान्यता दिली आहे. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के खर्च करावा लागणार असून, अनुदान ५० टक्के मिळणार आहे. या बाबत शासनाचे उपसचिव हे. गो. म्हापणकर यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

Grape
Grape Disease Management : द्राक्षावरील बुरशीजन्य, जिवाणूजन्य करपा रोगाचे व्यवस्थापन

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय प्रकल्प मंजूर समितीमध्ये अर्थसाह्य योजना २०२२-२३ मध्ये राबवण्यास मान्यता देण्यात आली होती. या प्रकल्पांतर्गत १२ कोटी १६ लाख रुपयांचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. योजनेच्या मंजूर निधीपैकी केंद्र सरकारचा ६० आणि राज्य सरकारचा ४० टक्के हिस्सा राहणार आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये ‘द्राक्ष पिकासाठी प्लॅस्टिक कव्हर तंत्रज्ञानासाठी अर्थसाह्य’ हा प्रकल्प राज्यात राबविण्यासाठी ६ कोटी १४ लाख निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

Grape
Grape Orchard Damage : अज्ञाताकडून द्राक्ष वेली तोडून बागेची नासधूस

हा प्रकल्प राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि लाभार्थी यांच्यामध्ये ५०:५० या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. त्यानुसार वैयक्तिक लाभार्थ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी ६ कोटी १४ लाख निधी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर प्लॅस्टिक कव्हर बसविण्यासाठी मदतीची मागणी झाल्यानंतर तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे यांच्या सूचनेने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निर्देशानुसार समिती स्थापन झाली. या समितीने एकरी ४ लाख २२ हजार खर्च असल्याबाबत राज्य सरकारला कळविले होते. मात्र या निर्णयानुसार शेतकऱ्यांना एकरी किती मदत दिली जाणार हे या निर्णयात स्पष्ट नाही.

लॉटरी पद्धतीने निवड

पुण्याचे राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक नियंत्रण अधिकारी असतील. प्रकल्पांतर्गत लक्ष्यांक आणि निधी वाटप द्राक्षाच्या क्षेत्रानुसार जिल्हानिहाय मंडलस्तरावरुन करण्यात येईल.

‘महाडीबीटी’ प्रणालीवर शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यावर निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. सक्षम अधिकाऱ्यांनी पूर्वसंमती दिल्यानंतर आणि काम पूर्ण झाल्याची तपासणी झाल्यावर अनुदान आधार लिंक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल.

‘ॲग्रोवन’कडून सातत्याने पाठपुरावा

नैसर्गिक आपत्ती ज्यामध्ये गारपीट, अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादकांचे सातत्याने मोठे नुकसान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर होणारा लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना प्लॅस्टिक आच्छादनासाठी अनुदान देण्याची मागणी ‘ॲग्रोवन’ने सातत्याने लावून धरली होती. अखेर ही मागणीला यश आले असून त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com