Cotton Trade Meeting  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Trade Meeting : जळगावात स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस व्यापार बैठक उत्साहात

Balasaheb Thackeray Agribusiness Rural Transformation Project : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत शहरातील रोटरी भवन येथे कॉटन मार्केट मीटचे (व्यापार बैठक) आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

Jalgaon News : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत शहरातील रोटरी भवन येथे कॉटन मार्केट मीटचे (व्यापार बैठक) आयोजन करण्यात आले होते.

बैठकीत कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापक जयेश महाजन, नाशिक सुनील वानखेडे, आत्माचे प्रकल संचालक रविशंकर चलवदे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनचे प्रदीप जैन, अविनाश काबरा, डॉ. बी. डी. जडे, जळगाव येथील कापूस संशोधन केंद्राचे जी. बी. चौधरी, ममुराबाद (ता.जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. हेमंत बाहेती, विषय विशेषज्ञ वैभव सूर्यवंशी, संशोधक, शेतकरी, बँक अधिकारी, विविध खते, कीटकनाशके, बियाणे पुरवठादार कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कापूस पिकाच्या मूल्य साखळी मधील सध्याची परिस्थिती व त्यामध्ये अपेक्षित बदल सुचविण्यासाठी सर्व संबंधितांना बोलाविण्यात आले होते. प्रास्ताविक चलवदे यांनी केले. त्यांनी बदलत्या हवामानानुसार शेती पद्धती व शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, तसेच स्मार्ट प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती दिली.

कापूस अर्थशास्त्र बदलवायचे असल्यास जास्त रुई उतारा असलेल्या वाणाची निवड करणे आवश्यक आहे. एकजिनसी व स्वच्छ कापूस वेचणी करायला हवी. गट तयार करून स्मार्ट अंतर्गत कापूस शेती करावी. यात वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठवणूक करण्याची सुविधा आहे. यात अपेक्षित दर असल्यास आपल्या कापूसगाठींची विक्री करता येते. सुनील वानखेडे यांनी मार्गदर्शनात स्मार्ट प्रकल्पाच्या बाबींविषयी महिती दिली.

पणन महासंघाचे महाजन म्हणाले, की शेतकरी लागवडीसाठी वजनदार कापूस वाणाची निवड करतात. त्यामुळे रुई उतारा कमी येत आहे. त्यामुळे कापसाची गुणवत्ता, धाग्याची लांबी, तलमता, रुई उतारा या तांत्रिक संकल्पनेपासून शेतकरी दूर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT