Agricultural Financial Assistance Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Update : दहा लाखांवर कापूस,सोयाबीन उत्पादकांना मिळणार अर्थसाहाय्य

Agricultural Financial Assistance : शासनाने अतिरिक्त अर्थसंकल्पात कापूस व सोयाबीन पिकांचे उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली आहे.

Team Agrowon

Buldhana News : शासनाने अतिरिक्त अर्थसंकल्पात कापूस व सोयाबीन पिकांचे उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली आहे. यासाठी जिल्ह्यात सुमारे १० लाख ३०,५८८ शेतकरी पात्र आहेत. यात दोन लाख ३६०५ कापूस उत्पादक, तर ७ लाख ९४,५३८ सोयाबीन उत्पादकांचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागल्याने या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली आहे.

गेल्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार, तर यापेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार कापूस व सोयाबीन उत्पादक संबंधित शेतकऱ्यांनी केलेल्या ई- पीक पाहणी क्षेत्रानुसार प्रती हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिले जाईल.

बुलडाणा जिल्ह्यात ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली आहे त्यांनी संमती पत्र व आधारकार्ड आपल्या गावा संबंधित कृषी सहाय्यकाकडे लवकरात लवकर जमा करावे. जेणेकरून आर्थिक मदत वाटप आधार लिंक बँक खात्यात जमा करणे सोयीचे होईल असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

तालुका कापूस सोयाबीन एकूण

बुलडाणा २४१४ १११८९६ ११४३१०

चिखली १६०५ १३३८७३ १३५४७८

मोताळा ५०५२६ १८२५४ ६८७८०

मलकापूर ३१०४१ २११२७ ५२१६८

खामगाव २६६९८ ५७१५३ ८३८५१

शेगाव १००२४ ५००६९ ६००९३

नांदुरा २७१०९ ३०२४१ ५७३५०

जळगाव जामोद १९२१८ २९६७४ ४८८९२

संग्रामपूर ११५७७ ३८२२४ ४९८०१

मेहकर १८०९ ११०९४९ ११२७५८

लोणार ३१८५ ७७३७४ 1८०५५९

देऊळगावराजा २५६३२ ३५७२८ ६१३६०

सिंदखेडराजा २५२१२ ७९९७६ १०५१८८

एकूण २३६०५० ७९४५३८ १०३०५८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT