Soybean, Cotton Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Agriculture Subsidy : गेल्या खरिपात सोयाबीन व कापसाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या अर्थसाह्याचा लाभ जिल्ह्यातील २ लाख ४ हजार ४४७ शेतकऱ्यांना मिळाला आहे.

Team Agrowon

Amaravati News : गेल्या खरिपात सोयाबीन व कापसाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या अर्थसाह्याचा लाभ जिल्ह्यातील २ लाख ४ हजार ४४७ शेतकऱ्यांना मिळाला आहे. सुमारे ९६.९६ कोटी रुपये या योजनेंतर्गत वितरित करण्यात आले आहेत.

गत खरिपात नैसर्गिक आपत्ती व बाजारात न मिळालेले दर यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. विशेषतः कापूस व सोयाबीनला बाजारात हमीदराच्या तुलनेतही दर मिळू शकलेले नाहीत. या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने ०.२० ते दोन हेक्टरच्या मर्यादेत मदतीची घोषणा केली.

या अर्थसाहाय्याचे वितरण प्रारंभ झाले असून पहिल्या टप्प्यात २ लाख ४ हजार ४४७ शेतकऱ्यांना लाभ त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आला आहे. ९६.९६ कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ३ लाख ४६ हजार २२५ शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली असून त्यापैकी २ लाख ३२ हजार शेतकऱ्यांचा डेटा अपलोड झाला आहे. यातील ८४ हजार ५०८ कापूस उत्पादक व १ लाख १९ हजार ९३९ सोयाबीन उत्पादक शेतकरी लाभान्वित झाले आहेत.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५८.६२ कोटी तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ३८.३३ कोटी रुपये वितरित करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात लाभ वितरित करण्यात येणार आहे.

एकूण ई-पीक नोंदणी ३,४६,२२५

डेटा एन्ट्री २.३१ लाख

शेतकरी संख्या २ ,०४,४४७

कापूस उत्पादक ८४,५०८ (३८.३३ कोटी रुपये)

सोयाबीन उत्पादक १,१९,९३९ (५८.६२ कोटी रुपये)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Microfinance Loan: सूक्ष्म कर्जाचा विळखा मोठा

Agrotech 2025: कृषी विद्यापीठातर्फे अकोल्यात आजपासून प्रदर्शन

Soil Degradation Issue: खत पिशवीवर तांत्रिक माहिती नसल्याने माती ऱ्हासाचा धोका

Kidney Sale Case: पंजाबचा हिमांशू किडनी विक्री प्रकरणात होता कार्यवाहक

Farm Equipment: खेड तालुक्यात ‘महाडीबीटी’तून ट्रॅक्टर, शेती अवजारांचे वाटप

SCROLL FOR NEXT