Cotton and Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन अर्थसाह्य वेबपोर्टलचा ‘अॅक्सेस’ मिळेना

Team Agrowon

Parbhani News : राज्य शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादकांना जाहीर केलेल्या अर्थसहाय्याच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.त्यासाठी www.scagridbt.mahait.org.in या वेबपोर्टलवर शेतकऱ्यांची माहिती भरावी लागत आहे. परंतु मागील तीन चार दिवसांपासून या वेबपोर्टल चा अॅक्सेस मिळण्यास अडचणी येत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांची माहिती अपलोड करुन ई-केवायसी करण्याची प्रक्रिया अडखळत सुरु आहे. बुधवार (ता. २५) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ३ लाख ३५ हजार २५७ शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले होते. अद्याप २ लाख ३० हजार ६२७ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित होते.

शेतकऱ्यांनी तत्काळ ई-केवायसी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले आहे. गतवर्षी (२०२३) बाजारभाव कमी झाल्यामुळे कापूस व उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्याबद्दल राज्यशासनाकडून खरिपातील ई-पीकपाहणी पोर्टलवर नोंद असलेल्या कपाशी व सोयाबीनच्या क्षेत्रानुसार परिगणना करुन अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.

२० गुंठे पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १ हजार रुपये तर २० गुंठेपेक्षा अधिक क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य २ हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतिपत्र व नाहरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत संकलित करून शासनाने महाआयटीकडून तयार केलेल्या www.scagridbt.mahait.org.in या वेबपोर्टलवर माहिती भरली जात आहे.

त्याकरिता कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय पात्र लाभार्थ्यांच्या आधारक्रमांक संलग्न बँक खात्यांत जमा होते याची खात्री करण्यासाठी राज्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी नजीकच्या जन सुविधा केंद्रावर (सीएससी) जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. ई-केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावरच एकवेळ अनुदान वितरणासाठी शेतकरी पात्र ठरतील. परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये एकूण २६४ कृषी सहाय्यक आहेत.

कापूस उत्पादक १ लाख २९ हजार ७४९ व सोयाबीन उत्पादक ४ लाख ३६ हजार २९१ मिळून एकूण ५ लाख ६५ हजार ८३९ शेतकरी आहेत. कपाशीच्या १ लाख १ हजार ३६ आणि सोयाबीनच्या ३ लाख ५६ हजार २९१ मिळून एकूण ४ लाख ५७ हजार ३२७ शेतकऱ्यांनी (८०.८२ टक्के) नाहरकत पत्र दिले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनी तत्काळ नाहरकत प्रमाणपत्र देऊन ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

परभणी जिल्हा कापूस,सोयाबीन

अर्थसहाय्य ई-केवायसी स्थिती

तालुका ई-केवायसी पूर्ण ई-केवायसी प्रलंबित

परभणी ५५१४१ ४३८६४

जिंतूर ५०१८२ ३८७८०

सेलू ४१४८५ २८६१२

मानवत २५७७६ १६९४४

पाथरी २९६७१ १७८२३

सोनपेठ २२९२४ १५८९२

गंगाखेड ३९८४० २८९६८

पालम ३३७९३ २०४२२

पूर्णा ३६४४५ १९३२२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dhananjay Munde : उद्याच कापूस आणि सोयाबीनचं अनुदान ६५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंची पुन्हा ग्वाही

Bogus Fertilizer : बोगस निविष्ठा प्रकरणात कृषी विभागाची भूमिका संशयास्पद

Cotton Productivity : सघन कापूस लागवड उत्पादकता वाढीस पूरक

Rabi Season 2024 : रब्बीसाठी तीन लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

Agriculture Awards : सरकारच्या कृषी पुरस्कार गोंधळ; शेतकऱ्यांच्या रोषानंतर कार्यक्रम सुरू

SCROLL FOR NEXT