Cotton Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation: साडेचार लाख हेक्टरवर कापसाचा पेरा

Kharif Season 2025: यंदा जिल्ह्यातील साडेनऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यातील ५० टक्के म्हणजे चार लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

Team Agrowon

Yavatmal News: यंदा जिल्ह्यातील साडेनऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यातील ५० टक्के म्हणजे चार लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

जिल्ह्यात चांगल्या प्रतीचे बियाणे, खते, कीटकनाशक आतापासून शेतकऱ्यांनी घेऊन ठेवण्यास सुरुवात केली आहे. खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. यावरच वर्षभराचा डोलारा अवलंबून असतो. शेतकऱ्यांना उच्चप्रतीचे बियाणे, खते आदी कृषिनिविष्ठा मिळाव्यात, यासाठी कृषी विभागाने तयारी केली आहे.

जिल्ह्यात यंदा नऊ लाख ५५ हजार हेक्टरवर खरीप हंगामाची लागवड होण्याचा अंदाज आहे. त्यात कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग या प्रमुख पिकांसह इतरही पिकांचा समोवश आहे. असे असले तरी तब्बल ५० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड शेतकरी करणार आहेत. यंदा चार लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होण्याचा अंदाज आहे.

यासाठी बियाणे पाकिट दाखल झाले आहे. बियाण्यांची मागणी पाहता प्रशासनाने आधीपासूनच तयारी करून ठेवली आहे. त्यामुळे बियाण्यांची अडचण येणार नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. त्यामुळे पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना बियाण्यांची अडचण जाणार नाही. काही विशिष्ट वाणाला शेतकऱ्यांची अधिक पसंती दिसत आहे. त्यामुळे काही भागांत ठरवून दिलेल्या मूल्यांच्या वर बियाणे विक्री केली जात आहेत.

कपाशीचे मुबलक बियाणे

जिल्ह्यात लागवडीसाठी बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. कापूस बियाण्यांच्या पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. ग्राम बीजोत्पादन मोहीम व शेतकऱ्यांकडचे स्वत:चे बियाणे उपलब्ध आहे. त्याचबरोबर महाबीज व खासगी असे मिळून सोयाबीन बियाणे उपलब्ध आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

Crop Damage: मे, जूनमध्ये पावसामुळे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; कृषी विभागाची माहिती

Goras Bhandar Closure: गोरस भंडारावर कारवाई; दररोज होणाऱ्या ३ हजार ५०० लिटर दूध संकलनावर परिणाम

Offline Fertilizer Purchase: ...तोपर्यंत ऑफलाइन खत खरेदी सुरू ठेवा: शेतकरी संघटना

Banana Rate: खानदेशात केळी दर २९०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT