
Buldana News : आगामी खरीप हंगामासाठी मलकापूर तालुक्याचे नियोजन पूर्ण झाले असून यंदा कपाशीच्या क्षेत्रात तीन हजार हेक्टरने घट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या तालुक्यात मक्याचे क्षेत्र वाढेल. तर सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रातही हजार हेक्टरने वाढ होणार असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
तालुक्यात एकूण ४२ हजार ८३७ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामासाठी पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने कपाशी, तूर, मका आणि सोयाबीन या पिकांचा समावेश आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कपाशीचे क्षेत्र मागील वर्षाच्या तुलनेत घटून यंदा १६ हजार ५० हेक्टरपर्यंत येईल. तर मक्याचे क्षेत्र २ हजार हेक्टरने वाढून १० हजार हेक्टर होईल, असा अंदाज आहे. सोयाबीन व तुरीच्या क्षेत्रातही वाढ अपेक्षित आहे.
इतर पिकांमध्ये मूग, उडीद, भुईमूग व ज्वारीचा समावेश आहे. रासायनिक खतांच्या वापरासाठी एकूण १४ हजार ३६५ टन खताची आवश्यकता आहे. हे खत ग्रेडनिहाय विक्रेत्यांकडे महिन्याच्या दरम्यान उपलब्ध होईल.बियाणे व खताच्या विक्रीदरम्यान कोणतीही फसवणूक होऊ नये, तसेच काळाबाजार रोखण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
याशिवाय, विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी सहायकांना संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी. बियाणे व खत खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. कोणतीही अडचण आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन मलकापूर तालुका कृषी अधिकारी ललित सूर्यवंशी यांनी केले आहे.
बियाणे आणि खतांचा साठा मुबलक
कपाशीच्या १६,०५० हेक्टर क्षेत्रासाठी अंदाजे ८०,२५० बियाण्याची पाकिटे आवश्यक असून, याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सोयाबीनसाठी आवश्यक ९ हजार क्विंटल बियाण्यापैकी ७०० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे घरचे उपलब्ध आहे. उर्वरित बियाणे महाबीज व खासगी कंपन्यांकडून मिळणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.