Cotton Picking  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Picking Wages : कापूस वेचणीच्या मजुरीत वाढ सुरूच

Cotton Picking Season : खानदेशात कापूस उत्पादक कापूस वेचणीच्या दरवाढीमुळे मेटाकुटीस आले आहेत. वेचणीचे दर सहा रुपये प्रतिकिलो असे ऑक्टोबरमध्ये होते.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कापूस उत्पादक कापूस वेचणीच्या दरवाढीमुळे मेटाकुटीस आले आहेत. वेचणीचे दर सहा रुपये प्रतिकिलो असे ऑक्टोबरमध्ये होते. ते आजघडीला १० ते ११ रुपये प्रतिकिलो, असे आहेत. ही दरवाढ मागील महिनाभरात थांबलेलीच नाही.

कापसाचे अतिपावसात सर्वत्र नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यात अनेकांच्या कापसाची बोंडे उमलली होती. अशात पावसाने बोंडे काळवंडू लागली आहेत. कापूस वेचणी करून घेण्याची धावपळ शेतकरी करीत आहेत. परंतु मजूरटंचाई कायम आहे. सध्याच्या प्रतिकूल वातावरणातही जळगाव, चोपडा भागांत काही शेतकरी कापूस वेचणी करून घेत आहेत.

परंतु यासाठी सध्या प्रतिकिलो १० ते११ रुपये दर यानुसार मजुरी द्यावी लागत आहे. कापूस ओला आहे, त्याचे वजन अधिक आहे. तो वाळवून वजन कमी होईल. अर्थात, यात शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. परंतु शेतातच कापूस भिजत राहिल्यास हाती काहीच येणार नाही, अशी स्थिती आहे.

१८० ते २०० रुपये रोज, अशी मजुरीदेखील आहे. परंतु या मजुरीनुसार कापूस वेचणी करून घेताना फारसा कापूस येत नाही. कारण एक मजूर यानुसार काम करताना १० ते १२ किलोच कापसाची वेचणी करतो. यात वित्तीय नुकसान होते. यातच गुलाबी बोंड अळी, बोंड सड यामुळे कापूस वेचणी करताना अडचणी येतात. बोंड व्यवस्थित काढले जात नाही.

काहीसा अधिकचा वेळ त्यासाठी लागतो. यामुळे शेतकरी प्रतिकिलो यानुसार मजुरी देऊन वेचणी करून घेत आहेत. वेचणीसाठी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, धुळ्यातील शिरपूर भागात सातपुडा पर्वतातून मजूर मंडळी येत आहे.

मजुरांची ने-आण करण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रवास भाडे द्यावे लागत आहे. यामुळे कापसाचा उत्पादन खर्च आणखी वाढला आहे. कापसाचे दर समाधानकारक स्थितीत नाहीत. यामुळे अडचणी वाढत आहेत. दुसरीकडे खर्च करावाच लागत आहे.

खानदेशात अनेकांचे कापूस वेचणीवर आलेले असतानाच पाऊस सुरू झाला आहे. काही भागांत कमी, तर काही भागांत अधिकचा पाऊस झाला आहे. अनेक शेतकरी निरभ्र वातावरणाची प्रतीक्षा करीत आहेत. अशातच एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांची कापूस वेचणी सुरू होईल. यामुळे मजूरटंचाई आणखी वाढेल, असेही चित्र खानदेशात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध

Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT