Cotton Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market : दरात सुधारणेअभावी कापूस विक्रीसाठी बाजारात

Cotton Rate : पुलगाव बाजार समितीत सात लाख क्‍विंटल आवक

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Cotton Production : वर्धा ः कापसाच्या दरात वाढीची कोणतीच शक्‍यता नसल्याने शेतकऱ्यांकडून कापूस विक्रीसाठी आणला जात आहे. त्यामुळेच बाजारातही आवक वाढती असून पुलगाव बाजार समितीअंतर्गत देवळी व पुलगाव बाजारांत आतापर्यंत सात लाख क्‍विंटल कापसाची आवक नोंदविण्यात आली. एकट्या पुलगाव बाजार समितीची रोजची आवक तीन हजार क्‍विंटलच्या पुढे असल्याची माहिती पुलगाव बाजार समितीचे सचिव दीपक नांदे यांनी दिली.

गेल्या वर्षीच्या हंगामात कापसाचे दर १० ते १२ हजार रुपयांवर गेले होते. त्यामुळे यंदाही कापसाच्या दरातील तेजी कायम राहील, अशी अपेक्षा वर्तविली जात होती. परंतु हंगाम अंतिम टप्यात असतानाही दर वधारले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना ७४०० ते ७५०० रुपये प्रतिक्विंटलने कापसाची विक्री करावी लागली. आताही याच दराने कापसाचे व्यवहार होत आहेत. कापूसदरात तेजीची शक्‍यता नसल्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणला आहे. त्याच्याच परिणामी पुलगाव बाजार समिती व उपबाजार देवळीमध्ये कापसाची आवक वाढती आहे.

पुलगाव बाजारात रोज सरासरी अडीच ते तीन हजार क्‍विंटल आणि त्या पाठोपाठ देवळी उपबाजारात २५० ते ३०० क्‍विंटल कापसाची आवक होत आहे. पुलगावला जिनिंगची संख्या अधिक असल्याने तेथील व्यापारी रोज लिलावात सहभागी होतात. बाजारातच खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचा चुकाऱ्याचा प्रश्‍नही निर्माण होत नाही. त्यामुळे शेतकरी देखील बाजारातच कापूस विक्रीला पसंती देत आहेत. परिणामी हंगामात सात लाख क्‍विंटलपेक्षा अधिकची आवक नोंदविली गेली.

पुलगाव बाजार समितीअंतर्गत आठ जिनिंग व्यावसायिकांना खरेदी परवाने देण्यात आले आहेत. देवळी उपबाजाराच्या माध्यमातून तीन परवाने दिले आहेत. मार्केट यार्डमध्ये लिलाव होतो. खाली ताडपत्री आंथरून त्यावर गाडीतील काही किलो कापूस टाकला जातो. त्याआधारे व्यापारी बोली लावतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जानिहाय चांगला दर मिळत आहे.
- दीपक नांदे, सचिव, बाजार समिती पुलगाव, वर्धा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार निर्णय; उपसा जलसिंचन योजनेसाठी वीज दर सवलतीला मुदतवाढ

Namo Installment : नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरण

Goat Farming : यशस्वी शेळीपालनातील विशाल

Education Innovation: लिहायला लावणारा शिक्षक

Dairy Farming Success : संघर्षाला मिळाला पूर्णविराम

SCROLL FOR NEXT