Agriculture Success Story : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिकलठाणा येथील दहीहंडे कुटुंबाकडे चित्ते पिंपळगाव शिवारात दहीहंडे या संयुक्त कुटुंबाची ६० एकर शेती आहे. पैकी कुटुंबातील नव्या पिढीचे विशाल यांच्या घरची २० एकर शेती आहे. संयुक्त कुटुंबाच्या शेतीची जबाबदारी व व्यवस्थापन विशाल यांचे वडील संतोष जगन्नाथ दहिहंडे हे गोपाल सुदाम दहीहंडे या पुतण्याच्या मदतीने सांभाळतात. .विशाल यांच्या कुटुंबात वडिलांसह आई गंगा, भाऊ विनायक, आजोबा जगन्नाथ, आजी तुळसाबाई असे सदस्य आहेत. प्रत्येकाकडील कामाची निश्चित विभागणी असून त्यादृष्टीने सर्वजण आपापल्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. शेतात तूर, मका, मोसंबी, डाळिंब, पपई, केसर आंबा, टोमॅटो, खरबूज, टरबूज, अशी पिकांची विविधता दिसून येते. सिंचनासाठी दोन मोठ्या शेततळ्यांना विहिरींची जोड देण्यात आली आहे. शेतीला पूरक म्हणून शेळीपालन आणि सुमारे २० देशी गाईंचे संगोपन केले आहे. त्यातून शेतीची शेणखत व गोमूत्राची गरज पूर्ण केली जाते..हिंमत ठेऊन पुन्हा प्रयत्नविशाल यांनी लहानपणापासूनच पाळीव प्राणी व पक्षांची आवड जपली आहे. शिक्षण घेताना वडिलांना शेतीकामांत ते मदत करत. त्यातूनच सन २०१९ मध्ये त्यांनी शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सुमारे ७० बाय ४० फूट आकाराचे हवा खेळतीराहणारे शेड बांधले. सिरोही, सोजत, उस्मानाबादी आदी जातींच्या शेळीपालनाला पसंती दिली. उस्मानाबादी वगळता अन्य शेळ्यांना वातावरण पोषक ठरले नाही. तसेच तांत्रिक कारणांमुळे काही प्रमाणात शेळ्यांची मरतुकही झाली. अर्थात पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला म्हणून विशाल खचले नाहीत. त्यांनी पुन्हा नव्या .जोमाने शेळीपालनाचा बारकाईने व शास्त्रीय अभ्यास सुरू केला. सातारा जिल्ह्यातील फलटण परिसरातील निंबकर कंपनीतून २०२० मध्ये आफ्रिकन बोअर जातीच्या १० शेळ्या व एक नर आणून शेळीपालनाला आकार देण्याचा प्रयत्न केला. एक ते दोन वर्षांच्या तसेच वजन व प्रकृतीनुसार सुमारे ५० हजार ते एक लाख रुपये किंमत असलेल्या या शेळ्या होत्या. सुमारे पाच ते सहा लाखाची गुंतवणूक केली..Dairy Farming Success : तेवीस वर्षाचा पृथ्वीराज झालाय कुटुंबाचा मुख्य कणा .व्यवस्थापनातील बाबीचाऱ्यामध्ये स्वयंपूर्णता मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. सुमारे ८० टक्के चारा घरच्या शेतात उत्पादित होतो. तीन- चार एकरांत मका, मेथीघास , दशरथ घास, नेपियर आदींची लागवड केली आहे. गरजेनुसार भुस्सा स्वरूपातील काही खाद्य शेतकऱ्यांकडून घेतले जाते. याशिवाय पेंड, गोळी पेंड, मिनरल मिक्सर आदी स्वरूपात दररोज प्रति शेळी किमान ३०० ग्रॅम खाद्य देण्यात येते. वर्षभरातील आवश्यक तो सर्व लसीकरण कार्यक्रम राबवला जातो. आजवर अपवादात्मक स्थितीतच रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्याचे विशाल सांगतात. संगोपनातील अन्य बाबींविषयी बोलायचे तर ७० बाय ४० फुटाच्या शेडमध्ये २० बाय २० फूट आकाराचे सुमारे आठ कंपार्टमेंटस आहेत. प्रति कंपार्टमेंटमध्ये मोठ्या शेळ्या १० ते १५ तर पिल्ले असल्यास २० ते २५ संख्येने ठेवली आहेत. आजारी, समआचरण असलेल्या, मारक्या अशा स्वभावानुसार त्यांची विभागणी केली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टब आहे. मुक्त संचार अनुभवता यावा म्हणून कंपार्टमेंट मध्ये काही साहित्य ठेवून त्यावर बसण्याची सोय केली आहे. गव्हाणीतच चारा आणि खुराक दिला जातो. घरच्या उत्पादित मक्यापासून मुरघास तयार केला आहे. शेळयांची संख्या लक्षात घेता वर्षभरात सुमारे तीन लाखांचा खुराक लागतो. लसीकरण, औषधोपचार तसेच विविध प्रकारच्या भुश्शांसाठी प्रत्येकी लाख तर मजुरांसाठी सुमारे २.५ लाख रुपये खर्च होतो. बहुतांश चारा शेतातच उत्पादित होत असल्याने त्याचा खर्च यात समाविष्ट केलेला नाही. वर्षभरात ३० ते ३५ लाखांची उलाढाल होते. घरचे सर्व सदस्य शेती व पूरक व्यवसायांत राबतात. शिवाय मदतीला दोन मजूर तैनात केले आहेत..Goat Farming Success: भूमिहीन मजुराने शेळीपालनातून गाठली आर्थिक सक्षमता .जातिवंत ‘ब्रीड’ जपलेयोग्य नियोजनातून व अनुभवांमधून विशाल यांनी व्यवसायाला गती दिली. दहा शेळ्या व एक नर यांच्यापासून सुरवात केलेल्या या व्यवसायात आजमितीला १२० शेळ्या आहेत. शेळ्या व बोकड मिळून दीडशेपर्यंत विक्री साधली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पिढीनुसार ब्रीडची शुद्धता किंवा जातिवंत पणा जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच त्यांच्याकडील शेळ्यांना मुंबई, पुणे, नाशिकसह बंगळूर, हैदराबाद, ओरिसा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात राज्यातूनही मागणी आहे. चार ते पाच महिन्याच्या पिल्लाला गुणवत्तेनुसार ३० ते ३५ हजार रुपये दर मिळतो. शुध्द वा जातिवंत ब्रीडला एक ते दीड लाख रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे विशाल सांगतात. विशाल यांच्याकडे ब्लास्ट आणि शो टाईम अशी आकर्षक नावे असलेले दोन जातिवंत आफ्रिकन बोअर नर आहेत. ब्लास्टचे वजन १०० किलो तर शो टाईम चे वजन १२० किलो आहे. शेळी संकरीकरण किंवा पैदाशीसाठी वेगवेगळ्या ‘लाईन’ असलेल्या नरांचा वापर होतो. त्यातून ‘इनब्रिडींग’ चा धोका टाळणे शक्य झाल्याचे विशाल सांगतात..शेळीपालनव्यवसाय- ठळक बाबीवर्षभरात मिळते दहा ते बारा ट्रॉली लेंडीखत.पैदाशीसाठी व ईद अशा दोन्ही हेतूंनी विक्री. आजवर विकलेल्या पिल्लांना मिळाला २५ हजार ते एक, सव्वा लाखांपर्यंत दर.विक्रीसाठी सोशल मीडियाचा होतो वापर.स्वतः विशाल अधिकाधिक वेळ या व्यवसायाला देतात.दिवाळीनंतर शेड ‘हायटेक’ करण्याचे नियोजनआरोग्य स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिल्याने मरतुकीचे प्रमाण कमी.विशाल दहिहंडे ८५३०३९५१०४.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.