Namo Installment : नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरण
Namo Scheme : "मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्याकरिता कार्यक्रम करून एका क्लिकवर पैसे जमा झाले आहेत. यामध्ये ९१ लाख ६५ लाख १५६ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १८९२ कोटी ६१ लाख रुपये जमा केले आहेत." असे मुख्यमंत्री म्हणाले.