Cotton Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Kharif Season : आगामी खरिपात यात वाढ होऊन २ लाख १० हजार ५०० हेक्टरवर कपाशीचा पेरा जाण्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून घटलेल्या कपाशीच्या लागवड क्षेत्रात यंदा वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख ४१ हजार २८२ हेक्टर असलेल्या नांदेडमध्ये मागील तीन वर्षांत सरासरी एक लाख ८७ हजार ६९१ हेक्टरपर्यंत लागवड खालावली आहे. परंतु आगामी खरिपात यात वाढ होऊन २ लाख १० हजार ५०० हेक्टरवर कपाशीचा पेरा जाण्याचा अंदाज आहे.

तर सोयाबीन चार लाख ५२ हेक्टरवर प्रस्तावित आहे. जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात सात लाख ७४ हजार ३३६ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.

मराठवाड्यात सर्वाधिक कपाशीची लागवड होणारा जिल्हा म्हणून नांदेडची ओळख होती. नांदेड येथे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कापूस संशोधन केंद्र आहे. या ठिकाणी संशोधित झालेल्या ‘नांदेड -४४’ या कपाशीच्या वाणाला देशात लौकिक मिळाला होता.

या नंतर कपाशीत ‘बिटी’ तंत्रज्ञान विकसित झाल्याने उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होईल, असे वाटत असताना अलीकडच्या काळात बिटीवर कीड-रोगांचा वाढलेला प्रादुर्भाव, गुलाबी बोंडअळीचा अतिरेक तसेच बाजारातील अस्थिर भाव यामुळे शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे वळला होता.

यामुळे दोन लाख ४१ हजार २८२ सर्वसाधारण क्षेत्र असलेल्या कपाशीचे सरासरी क्षेत्र घटून एक लाख ८७ हजार ६९१ हेक्टरवर आले. परंतु आगामी खरीप हंगामात मात्र कपाशीच्या प्रस्तावित क्षेत्रात दोन लाख १० हजार पाचशे हेक्टरपर्यंत वाढीचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

आगामी खरिपातील नियोजित पेरणी क्षेत्र (हेक्टर)

पीक सर्वसाधारण क्षेत्र सरासरी क्षेत्र प्रस्तावित क्षेत्र

सोयाबीन ३,५३,३१४ ४,४४,२४५ ४,५२,०००

कपाशी २,४१,२८२ १,८७,६९१ २,१०,५००

तूर ६७,४२३ ६९,२८८ ६६,५००

उडीद २९,६२५ २०,७१० १४,५००

ख. ज्वारी ४४,७४० १७,८७१ १३,०००

मूग २७,३९२ २०,७७० १५,२५०

मका ८२५ ७८७ १,०१२

तीळ ५६५ ३८० ४१०

कारळ ३६१ १७८ १५०

एकूण ७,६४,५९९ ७,६३,३५६ ७,७४,३३६

आगामी खरीप हंगामात सात लाख ७४ हजार ३३६ हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावीत आहे. यात कपाशीच्या सरासरी लागवड क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे, तर सोयाबीनच्या क्षेत्रातही वाढीचा अंदाज आहे. परंतु ज्वारी, मूग, उडीद व मका पेरणी क्षेत्रही घटण्याची शक्यता आहे.
- भाऊसाहेब बऱ्हा‍टे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT