CM Devendra Fadnavis Agrowon
ॲग्रो विशेष

CM Devendra Fadnavis: पंढरपुरात तीन महिन्यांत कॉरिडॉरचे काम सुरू होणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pandharpur Corridor: पंढरपूरमधील महत्त्वाकांक्षी कॉरिडॉर प्रकल्पाला येत्या तीन महिन्यांत सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मंदिर परिसराची पाहणी करत व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाची हमी दिली.

Team Agrowon

Pandharpur News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या उज्जैन काशी विश्‍वेश्‍वरच्या धर्तीवर पंढरपुरातही होऊ घातलेल्या कॉरिडॉरला येत्या तीन महिन्यांमध्ये कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. २९) येथे पत्रकारांशी बोलताना दिली. मंदिर परिसरातील व्यापारी आणि नागरिकांचा या कॉरिडॉरला विरोध आहे, पण सर्वांना विश्‍वासात घेऊनच सगळी कामे होतील, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी श्री विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंदिरातील सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

तसेच या सर्वांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांनी तयार केलेला आराखडा पाहिला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की आतापर्यंत कोणत्याही प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला नाही एवढा, किंबहुना त्यापेक्षाही जास्त मोबदला पंढरपूर मधल्या कॉरिडॉरबाधितांना देण्यात येईल,

यासाठी काही व्यावसायिक मालमत्ता, काही घरे ताब्यात घ्यावी लागणार आहेत. त्या लोकांचे सुद्धा योग्य पद्धतीने पुनर्वसन केले जाईल, त्यांना चांगला मोबदला दिला जाईल, आषाढीपूर्वी यातील काही कामे सुरू होतील आणि आषाढीच्या नंतर काही कामे सुरू होतील, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्यावरून मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये वाद करण्याची गरज आहे का, विनाकारण धनगर आणि मराठा असा वाद करणे योग्य नाही. यासंबंधी सर्वांनी बसून चर्चा केली, तर मार्ग निघेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

‘...कर्जमाफीबाबत सरकारची तीच भूमिका’

शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्‍नावर फडणवीस म्हणाले, की मी यावर अधिक काय बोलू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत भूमिका स्पष्टपणे मांडली आहे, तीच सरकारचीही भूमिका आहे. सध्याच्या परिस्थितीत ते शक्य नाही, पण त्यांनी कर्जमाफी करणे शक्यच नाही, असेही म्हटले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Success Story: क्षारपड जमिनीला दिली नवसंजीवनी

Gram Sadak Yojana: रस्त्यांसाठी ६४२९ कोटी मंजूर

Agriculture Technology: कृषी समस्या सोडवणुकीसाठी तंत्रज्ञान स्पर्धा महत्त्वाच्या...

Crop Insurance 2025 : यंदाच्या खरिपातही कमी भरपाई मिळणाची शक्यता जास्त

Stone Picker Machine: ट्रॅक्टरचलित दगड वेचणी यंत्र

SCROLL FOR NEXT