Land Record Agrowon
ॲग्रो विशेष

Land Record Entry : जमीन रेकॉर्डमधील चुकीची दुरुस्ती

Land Update : एका गावात चंद्रकांत आणि सूर्यकांत नावाचे दोन सख्खे भाऊ वडिलोपार्जित शेतजमीन एकत्रितरीत्या कसत होते.

शेखर गायकवाड

Land Record Update : एका गावात चंद्रकांत आणि सूर्यकांत नावाचे दोन सख्खे भाऊ वडिलोपार्जित शेतजमीन एकत्रितरीत्या कसत होते. चंद्रकांत थोरला भाऊ होता. चंद्रकांत चावडीवरचे सर्व व्यवहार बघायचा व घरातील इतर सगळा कारभार पण तोच पाहत होता.

धाकटा सूर्यकांत मात्र हा शेतीत राबायचा. सन १९७२ मध्ये गावांत एकत्रीकरण योजना म्हणजे गटवारी आली. सरकार लोकांच्या जमिनीचे वेगवेगळ्या ठिकाणचे तुकडे एकत्र करून जमीन खातेदारांना एका ठिकाणी देणार आहेत एवढेच सरकारच्या या योजनेबद्दल गावातील लोकांना समजले होते.

सरकारच्या या योजनेमध्ये गटवारीत जमीन कमी-जास्त होत नाही, असे कारभारी चंद्रकांतने सूर्यकांतला आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांगितले होते. काही दिवसांतच सरकारचे जमीन एकत्रीकरण योजनेचे काम सुरू झाले.

या योजनेमध्ये गावातील सातबारा बुक आणि तलाठ्याचे गावातील सगळे रेकॉर्ड भूमापन खात्याकडे गेले. तब्बल पाच वर्षे हे रेकॉर्ड गटवारीच्या खात्याकडे होते. पाच वर्षांनंतर जेव्हा गटवारीचे रेकॉर्ड गावात आले तेव्हा एक महिना चावडीवर गावातील सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्ड पाहायला उपलब्ध करुण दिले होते. चंद्रकांतने धाकटा भाऊ सुऱ्यांतला आपल्या जमिनीचे सर्व रेकॉर्ड बरोबर असल्याचे सांगितले.

या सगळ्या गटवारीच्या योजनेनंतर आता बरीच वर्षे उलटली. या कालावधीपर्यंत चंद्रकांत व सूर्यकांत यांचे वय झाले होते. धाकटा सूर्यकांत याची मुले आता मोठी झाली होती. मुलांनी जमिनीची सर्व जुनी कागदपत्रे काढली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, आपले चुलते चंद्रकांत यांच्या नावावर चार एकर जमीन जास्त होती व सर्व जमीन बागायत होती. सूर्यकांतची मुले एका वकिलाला भेटली.

वकिलाने सर्व कागदपत्रे घेऊन सुरवातीला पीकपाहणी बद्दल केस सुरू केली. त्यात त्यांचा दोन वर्षे कालावधी उलटूनही जमीन ताब्यात न आल्यामुळे सूर्यकांतच्या मुलांनी दिवाणी कोर्टात मनाईचा दावा लावला. त्यानंतर परत चार वर्षे उलटली.

नंतर मुलांनी चुलता चंद्रकांतच्या विरुद्ध जमीन वाटपाचा वेगळा दावा लावला व महसूल कोर्टात नोंदी विरुद्ध एक अपील केले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रेकॉर्डमध्ये चार एकर जमीन ज्या तुकडेबंदी कायद्यानुसार लागली त्या तुकडेबंदी कायद्यानुसार मात्र कोणताच अर्ज वकिलाने संपूर्ण कालावधीत केला नाही.

सांगायचे तात्पर्य म्हणजे एखाद्या कायदेशीर प्रश्नाचे उत्तर नेमके कशात आहे, हे त्या प्रश्नाच्या मुळाशी गेल्याशिवाय कळू शकत नाही. जमिनीच्या रेकॉर्डमध्ये पूर्वी झालेली चूक केव्हा झाली व कशामुळे झाली हे कळल्याशिवाय ती चूक दुरुस्त करणे अवघड असते. नाहीतर भलतीकडेच प्रयत्न म्हणजे दगडावर डोके आपटल्यासारखे आहे.

ई-मेल - shekharsatbara@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT