Coriander Rate agrowon
ॲग्रो विशेष

Coriander Rate : सणासुदीत कोथिंबिरीची पेंडी ६० रुपयांना, शेतकऱ्यांमध्ये समाधान

Coriander Rate Kolhapur : कोथिंबिरीची बाजारात तेजी असून पंधरा दिवसांपासून सततच्या पावसाने कोथिंबिरीचे नुकसान झाल्याने कोथिंबिरीची आवक केवळ चाळीस टक्केच होत आहे.

sandeep Shirguppe

Coriander Rate Kolhapur Market : काही दिवसांपूर्वी बाजारात आवक वाढल्याने कवडीमोल भावाने विकल्या जाणाऱ्या कोथिंबीर पेंडींला चांगला भाव मिळू लागला आहे. कोंथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने भाजीपाला कुजल्याने भाज्यांची आवक कमी झाली. याचा परिणाम भाजीपाला दरावर दिसून येत आहे. सध्या बाजारात ६० रुपये दराने कोथिंबीर पेंडी विकली जात आहे.

जून महिन्यात कोथिंबीरला चांगला दर मिळत होता परंतु आवक वाढल्याने दर कमी झाले होते. दोन दिवसांपासून दराने पुन्हा उसळी घेतली आहे. कोथिंबिरीची बाजारात तेजी असून पंधरा दिवसांपासून सततच्या पावसाने कोथिंबिरीचे नुकसान झाल्याने कोथिंबिरीची आवक केवळ चाळीस टक्केच होत आहे.

व्यापाऱ्यांना कोथिंबिरीस शेकडा पंधराशे ते चार हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. यंदाच्या हंगामातील हा उच्चांकी दर आहे. सध्या गणेशोत्सव तोंडावर असल्याने आणखी काही दिवस तरी ही तेजी टिकण्याची शक्यता आहे. शिरोळ तालुक्यातील कोथिंबीर उत्पादक भागामध्ये सातत्याने पाऊस होत असल्याने स्थानिक कोथिंबिरीची आवक रोडावली आहे. सध्या तालुक्यातील बाजारात कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात कोथिंबिरीची आवक होत आहे.

पंधरवड्यापासून थांबून थांबून जोरदार पाऊस पडत आहे. संततधार नसला तरी एक-दोन तासाला जोरदार सरी होत असल्याने पाणी साचून राहत आहे. यामुळे विशेष करून पालेभाज्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला कुजून जात असल्याने पालेभाज्यांची आवक अतिशय मर्यादित स्वरूपात होत आहे.

मागणीत विशेष वाढ नसली तरी उपाहारगृहे, हॉटेलना दररोज लागेल इतकी कोथिंबीरही उपलब्ध होत असल्याने बाजारात कोथिंबिरीची मोठी चणचण भासत असल्याचे चित्र आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्य कोथिंबिरीच्या खरेदीविना परतत आहेत.

दीर्घकाळ राहणार स्थिती

शिरोळ तालुक्यात सध्या शेतात दलदल निर्माण झाली आहे. यामुळे नव्याने कोथिंबिरीची लागवड शक्य नाही. पाऊस थांबून कोथिंबिरीची नवीन लागवड केल्यानंतर किमान पंधरा दिवसांनंतर कोथिंबीर बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही दरवाढ दीर्घकाळ राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

Ambeohol Project Rehabilitation: आंबेओहोळ प्रकल्पातील पुनर्वसन १०० टक्के पूर्ण होणार : मुश्रीफ

Beekeeping Scheme Subsidy: मधुमक्षिकापालन योजनेसाठी ५० टक्के अनुदान

Temple Waste Management: नंदवाळ मंदिरातील निर्माल्यापासून बनणार विविध वस्तू

SCROLL FOR NEXT