Maharashtra Politics : दोन तृतीयांश बहुमताने ‘मविआ’ सत्तेत येणार

Ramesh Chennithala : परिवर्तन करण्याची जनतेची मानसिकता बनलेली असून भ्रष्ट महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचून दोन तृतीयांश बहुमताने ‘मविआ’चे सरकार येईल असा, दावा काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
Ramesh Chennithala
Ramesh ChennithalaAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत काँग्रेस पक्षाने १७२ मतदार संघांचा आढावा घेतला आहे. २५ तारखेपर्यंत सर्व २८८ मतदार संघांचा आढावा पूर्ण होईल. राज्यातील वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे, परिवर्तन करण्याची जनतेची मानसिकता बनलेली असून भ्रष्ट महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचून दोन तृतीयांश बहुमताने ‘मविआ’चे सरकार येईल असा, दावा काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

टिळक भवनमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, की राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. हत्या, दरोडे, महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली आहे. पुण्यात तीन दिवसांत दोन हत्या करण्यात आल्या. महागाई आवाक्याबाहेर गेल्याने सण साजरे करणे अवघड झाले आहे. जनता प्रचंड त्रस्त आहे, पण महायुती सरकार मात्र घोटाळे करून पैसे वसूल करण्यात व्यग्र आहे.

Ramesh Chennithala
Political Strategy : महायुतीच्या ‘नरेटिव्ह’ला शेतकरी भुलतील?

‘मराठवाड्यासाठी केंद्राकडे मदत का मागत नाही?’

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, की मराठवाडा व विदर्भात पुराने थैमान घातले असून, १२ लाख एकरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. रस्ते, पूल वाहून गेले, परंतु केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राकडे लक्ष देत नाही. तेलंगण आणि आंध्र प्रदेशात पूर आल्यानंतर दोन केंद्रीय मंत्रालये तैनात करण्यात आली आहेत. कृषिमंत्री व अर्थमंत्री तातडीने मदत मिळावी यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

Ramesh Chennithala
Indian Politics : सत्तेची हाव घातक सिद्ध होतेय

महाराष्ट्रात मात्र अद्याप केंद्राचे पथकही आले नाही, केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न भावाची वागणूक का देत आहे, केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला अजून मदत का मिळत नाही. महायुतीचे नेते केंद्राकडे मदत का मागत नाहीत? राज्यातील गुंतवणूक वाढली असा देवेंद्र फडणवीस यांचा दावा आहे, तर मग राज्यात बेकारीचे प्रमाण प्रचंड का आहे, असा सवालही पटोले यांनी विचारला. बेकारी कमी का होत नाही, याची उत्तरे फडणवीस यांनी द्यावीत. भाजप व फडणवीस सातत्याने खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत, असेही पटोले म्हणाले.

या पत्रकार परिषदेला खासदार वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com