Co- Operative Sector Agrowon
ॲग्रो विशेष

Co- Operative Sector : संस्था पारदर्शकपणे चालवल्यास सहकार क्षेत्राची भरभराट ; राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

Haribhau Bagde : सहकारातून सामाजिक विकासाला चालना मिळत आहे. सहकार चळवळीतील संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालविल्यास सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल, असे मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Aahilyanagar News : अहिल्यानगर ः सहकारातून सामाजिक विकासाला चालना मिळत आहे. सहकार चळवळीतील संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालविल्यास सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल, असे मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.

शिर्डी (जि. अहिल्यानगर) येथे ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषदे’चे उद्‍घाटन राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार काशीनाथ दाते, सहकार विभागाचे अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, राष्ट्रीय सहकार परिषदेचे अध्यक्ष उदय जोशी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फिडरेशन ऑफ क्रेडिट युनियनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित हेत्तीयाराची यांच्यासह सहकार व पतसंस्था चळवळीचे पदाधिकारी उपस्थित होते.

बागडे म्हणाले, की भारतात १९०४ मध्ये सहकार कायदा झाला. त्याआधी महाराष्ट्रात सहकाराची पाळेमुळे रूजली आहेत. राज्य सहकारी बँकेची सुरुवात पतसंस्थेपासून झाली आहे. पतसंस्थेच्या चळवळीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मन लावून काम करण्याची गरज आहे‌. सहकार क्षेत्रातील चुका लपविण्यापेक्षा त्या सुधारण्यावर भर द्यायला हवा. आजही लोकांचा सहकारावर विश्वास आहे.

त्यामुळे सहकार वर्षात काही नवीन उपक्रम हाती घेऊन अडचणीतील असलेल्या संस्थांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. ज्यांच्या ठेवींचे व्याज कमी त्या ठेवींच्या परतीची हमी असते. त्यामुळे अधिक ठेवी, अधिक व्याज ही स्पर्धा पतसंस्थांनी निर्माण करू नये. ‘‘सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी शासन प्रयत्नशील आहे,’’ अशी‌ अपेक्षा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.

कर्जवाटपात पारदर्शकता असावी : पाटील
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, ‘‘सध्या महाराष्ट्रात १६ हजारांपेक्षा अधिक पतसंस्था कार्यरत असून या चळवळीत सुमारे ३० कोटी लोक सहभागी आहेत. सहकाराला उज्ज्वल भविष्य मिळवून देण्यासाठी ठोस नियमावली आखण्याची गरज आहे. कर्जवाटप करताना पूर्ण पारदर्शकता असली पाहिजे. शासनाचे धोरण विविध कार्यकारी सोसायट्या सक्षम करण्याचे आहे. सहकारी संस्थांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा. सहकारी संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT