Amit Shah kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Amit Shah : सहकार मंत्री अमित शाह आज कोल्हापुरात, राजकीय घडामोडींना वेग

Kolhapur Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यपाल राधाकृष्णन यांच्या दौऱ्यानिमित्त वरीष्ठ अधिकाऱ्यांसह आठशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

sandeep Shirguppe

Cooperation Minister Amit Shah : महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय सहकार आणि गृहमंत्री अमित शाह आज (ता.२५) कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते महासैनिक दरबार हॉल येथे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. केंद्रीय पर्यावरणमंत्री भुपेंद्र बघेल, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मेळाव्यानंतर राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली जाणार आहे.

विधानसभेसाठी पुढील महिन्यात आचारसंहिता लागू होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाची चर्चा युद्धपातळीवर सुरू आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते साडेपाचला अंबाबाई मंदिरात येतील. तेथून दर्शन घेऊन सहा वाजता ते महासैनिक दरबार हॉलमध्ये मेळाव्यासाठी उपस्थित राहतील. ते मेळावा संपल्यावर रात्री आठला विमानाने दिल्लीकडे रवाना होतील.

मेळाव्याला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, विजय जाधव यांच्यासह पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

अमित शाहंच्या दौऱ्याचे फलीत काय?

कोल्हापूर जिल्हा हे सहकाराच्या दृष्टीने महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक यांच्या माध्यमातून या जिल्ह्याचे राजकारण चालत असते याचा विचार करून भाजपने कोल्हापुरातूनच विधानसभा निवणुकीच्या प्रचाराला सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

अशातच सहकार महर्षी म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार कल्लाप्पाणा आवाडे यांचे पूत्र आमदार प्रकाश आवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यामुळे साखर कारखान्यांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीची भाजपकडून मोर्चे बांधणी करण्याचे काम सुरू आहे.

आठशे पोलिसांचा बंदोबस्त

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यपाल राधाकृष्णन यांच्या दौऱ्यानिमित्त वरीष्ठ अधिकाऱ्यांसह आठशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. शहरातील वाहतूक मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे. महासैनिक दरबार हॉलमध्ये गृहमंत्री शहा यांच्या मेळाव्यावेळी धैर्यप्रसाद चौक ते लाईन बझार मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार आहे. तसेच त्यांचा वाहन ताफा विमानतळाहून धैर्यप्रसाद चौक मार्गावर विरुद्ध दिशेने जाणार आहे. दरम्यान, एक अपर पोलिस अधीक्षक, ८ उपअधीक्षक, १९ पोलिस निरीक्षक, ७५ सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, तसेच ७०२ अंमलदारांचा असा बंदोबस्त तैनात असणार आहे.

राज्यपाल राधाकृष्णन आज कोल्हापुरात

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उद्या (ता. २५) कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. ते दुपारी तीनला शासकीय विश्रामगृह येथे येतील. त्यानंतर ते जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, पर्यावरण, क्रीडा, प्रसार माध्यमे, आदी क्षेत्रांतील विविध व्यक्तींशी संवाद साधणार आहेत. गुरुवारी (ता. २६) सकाळी अकराला ते हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Census : पशुगणनेनंतर पुढे काय?

Sugarcane Harvesting : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडणी धीम्या गतीने

Weather Update : परभणीत ९.६ अंश तापमानाची नोंद

Fruit Washer : नेहरू विद्यालयाच्या फळभाज्या धुण्याचे यंत्र उपकरण ठरले आकर्षण

Rabi Sowing : गहू, हरभऱ्याच्या पेरण्या लांबणीवर

SCROLL FOR NEXT