Rasta Roko Movement
Rasta Roko MovementAgrowon

Maratha Reservation : धुळे-सोलापूर महामार्गावर ‘रास्ता रोको’

Rasta Roko Movement : मराठा आंदोलकांनी वडीगोद्री गावाजवळ धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
Published on

Jalna News : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे मराठा आरक्षणावर ठाम असून उपोषणाच्या आठव्या दिवशी मनोज जरांगे यांची तब्बेत खालावली आहे, त्यांनी वैद्यकीय उपचार, पाणी, घेण्यास नकार दिला आहे.

जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (ता. २४) अंतरवाली सराटी येथे मोठा जनसमुदाय उपस्थित होता. तसेच मराठा आंदोलकांनी वडीगोद्री गावाजवळ धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. विशेष म्हणजे आंदोलकांमध्ये महिला आणि मुलीदेखील समावेश आहे. जवळपास तासाभर आंदोलकांनी दोन्ही बाजूंनी मार्ग रोखून धरला. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Rasta Roko Movement
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राला : शरद पवार

अठरापगड जातींची मोट बांधा : हाके

ओबीसी नेत्यांनो न घाबरता आपल्या मतांची भीती दाखवा. निवडणुकीत आपली ताकद दाखवा, घरात न थांबता बाहेर या. अठरापगड जातींना एक करा. स्वर्गिय गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे तुम्हाला काम करावे लागेल. अस्तित्व टिकवायचे असेल तर बाहेर या. आम्ही जीव हातावर घेतला आहे, असे आवाहन वडीगोद्री येथे उपोषणाच्या सहाव्या दिवशी मंगळवारी (ता. २४) प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले.

Rasta Roko Movement
Maratha Reservation : मराठा समाजाच्या नुकसानीला सर्व पक्षीय नेते जबाबदार : जरांगे

मराठा आंदोलकांनी जाळली फुलंब्री तहसीलदारांची खुर्ची

फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे आणि त्यांचे दोन साथीदार वसंत बनसोड, आजीनाथ साबळे यांनी आक्रमक होऊन मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने फुलंब्रीचे तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांची खुर्ची मंगळवारी (ता. २४) जाळून निषेध व्यक्त केला.

दरम्यान, तहसीलदारांची खुर्ची जाळल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायगाचे सरपंच साबळे आपल्या आगळ्यावेगळ्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com